Wednesday, 5 July 2023

भीमनगर नवीन वसाहत येथील संरक्षण भिंत पडली !!

भीमनगर नवीन वसाहत येथील संरक्षण भिंत पडली !!

*मनसेचे संघटक (रस्ता आस्थापना) शरद भावे यांनी संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधून देण्याची केली  मागणी*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              पावसात संरक्षण भिंत, झाडे कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी गेल्डा नगर येथील झाड कोसळून संरक्षण भिंत कोसळली होती तर आज जीर्ण झालेली भीमनगर नवीन वसाहत नवशक्ती क्रीडा मंडळ येथील संरक्षण भिंत दुपारी कोसळल्याने रहिवाशांची वहिवाट बंद झाली आहे. सुदैवाने वहिवाट मार्गावर कुणी नसल्याने दुर्दैवी घटना घडली नाही.मात्र सकाळी -दुपारी या वहिवाट वरून रहिवाशी, शाळकरी मुले व पालकांची मोठी रीघ असते. 

             भीमनगर जोड रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वहिवाट वरून नागरिकांची सारखी ये जा असते मात्र भिंत पडल्याने शाळेतील मुलांना,पालकांना व नागरिकांना ये- जा करणे अवघड होत आहे.स्थानिक मनसेचे रस्ता आस्थापना विभागाचे संघटक शरद भावे यांनी पालिकेकडे तक्रार करून खाली पडलेला दगडाचा ढीग उचलून मार्ग मोकळा करून द्यावा तसेच संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधून द्यावी अशी मागणी केली असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...