Wednesday, 5 July 2023

भांडुपच्या मेरी अँन इंग्लिश शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

भांडुपच्या मेरी अँन इंग्लिश शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              समाज विकास क्रांती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंह यांच्या वाढदिवसा निमित्त आज भांडुप येथील मेरी अँन इंग्लिश शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. अशोक सिंह हे भांडुप मधील उद्योजक असून त्यांनी नुकतेच समाज विकास क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष असून येणाऱ्या निवडणुकीत समाज विकास क्रांती पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. अशोक सिंह हे दरवर्षी आपला वाढदिवस विद्यार्थी तसेच तळागाळातील आदिवासी पाडे मध्ये जाऊन साहित्य, किट वाटप करून साजरा करतात. आज भांडुप येथील मेरी अँन इंग्लिश शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील मुलांना यावेळी साहित्य वाटप करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. जन्म दिवस हा आपल्या आयुष्यात वाढलेला दिवस असतो हा दिवस लोकांना आनंद देण्यासाठी साजरा करावा ही भावना मनात ठेवून मी दरवर्षी वाढदिवस साहित्य वाटप करून साजरा करतो असे अशोक सिंह यांनी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...