फादर एग्नेल इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्युट मधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वांद्रे येथील अभियंते घडवणाऱ्या फादर एग्नेल इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्युट मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांच्या समस्या येत्या पंधरवड्यात सुटणार आहेत. येथे एकीकडे नवीन कामगारांचे वेतन अधिक तर जून्यांचे कमी अशी तफावत आहे. त्यामुळे मनसे कर्मचारी सेनेने व्यवस्थापनास आज चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तरीही या काळात या समस्या सुटल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा मनसे कामगार संघटनेने दिला आहे. देशात उच्च दर्जाचे इंजिनियर घडवणार्या या नामांकीत संस्थेच्या संचालकांशी आज मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या चर्चा केली. यावेळी इन्स्टिट्युटचे व्यवस्थापक जयवंत यांनी येत्या 15 दिवसात आम्ही शिक्षक , कर्मचारी तसेच इतरही कामगारांच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले. तर यावेळी या इन्स्टिट्युट मधील शिक्षक , कर्मचारी यांनी मनसे कामगार संघटनेचे सदस्यपद स्वीकारले. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवू असा विश्वास त्यांना यावेळी उपाध्यक्ष राज पार्टे यांनी दिला.
स्टाफला भरपगारी रजा काट छाट न करता देण्यात यावी,पगारवाढ ही बेसिक तसेच एच आर ए मध्ये समान विभागून देण्यात यावी, अनिता गोनसालवीस या ऑगस्ट 2023 मध्ये सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी त्याच डिपार्टमेंट च्या संगीता डावरे याना पदभार द्यावा, पदोन्नतीनुसार त्यांची पगारवाढ करावी, रिकाम्या पदी नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, येथील सूरज श्रेष्ठ यांची लॉकडाऊन काळात एक महिना जास्तीची भर पगारी रजा कट केली होती ती पुन्हा त्यांच्या खात्यात जमा करावी, 15 ते 20 वर्षे काम करूनही केवळ 14 हजार वेतन मिळते. मात्र नवीन नियुक्त होणाऱ्याना 20 ते 25 हजार मिळतो ही तफावत दूर केली जावी यासह कामगारांना कॅन्टीनची सुविधा सुरू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment