राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वाडो स्पर्धेसाठी आर्यन येवले ची निवड !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी येथे झालेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये 28 जिल्ह्यातील 500 हुन अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत साहेब, तायक्वाडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील वॉरिअर तायक्वाडो अकादमीचा खेळाडू आर्यन संदिप येवले याने पुमसे प्रकरामध्ये वैयक्तिक - सुवर्ण पदक, ग्रुप प्रकरामदे सुवर्णपदक पटकावले असून, 6 ते 8 जूलै 2023 रोजी शिमोगा, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात आर्यनची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय तायक्वाडो प्रशिक्षक संदिप येवले ( सचिव मुंबई उपनगर ), पुनम येवले यांचे यांचे आर्यनला तायक्वाडो खेळाचे मार्गदर्शन मिळत आहे. आर्यन हा रामनिरंजन झूनझुणवाला घाटकोपर या कॉलेज मधे शिकत आहे. मुंबई उपनगर जिल्हा, वॉरिअर तायक्वाडो अकादमी तर्फे तसेच क्रीडा शिक्षक यतिन राणे सर ( R. J college ) यांच्या तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..
No comments:
Post a Comment