शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्या पत्नीचे दुःखद निधन !
कल्याण, प्रतिनिधी - शिवसेना पक्ष कल्याण शहरप्रमुख व MICHI मा. अध्यक्ष श्री. रवी पाटील यांच्या पत्नी अनिता रविंद्र पाटील यांचे बुधवारी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. यावेळी अंत्ययात्रेला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे तसेच सर्वपक्षीय मा. नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व मित्र परिवार अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
मा. रविंद्र पाटील हे माजी नगरसेवक असून त्यांच्या कार्यामुळे अत्यंत लोकप्रिय आहेत. सर्वार्थाने त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ. अनिता रविंद्र पाटील यांच्या निधनाने संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार १३ जूलै २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सिद्धेश्वर मंदिर, पाचवा मैल (कांबा) येथे होईल. तर उत्तर कार्य रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता सिध्दीविनायक हॉल, भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण पश्चिम येथे होईल.
निधन वृत्त समजताच त्यांना शिवसेना तसेच सर्वपक्षीय जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व MICHI चे सहकारी यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment