Friday, 7 July 2023

कल्याण तालुक्यातील जनतेच्या नशिबी 'गढूळ पाणीच, शुद्धीकरण यंत्रणाच नाही, ऐन पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार ?

कल्याण तालुक्यातील जनतेच्या नशिबी 'गढूळ पाणीच, शुद्धीकरण यंत्रणाच नाही, ऐन पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार ?

कल्याण, (संजय कांबळे) : जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील ४१ गावासाठी सुमारे ३५ कोटींचा निधी उपलब्ध होऊन देखील तसेच प्रती माणसी ५५ लिटर शुद्ध पाणी मिळण्याचे धोरण यामध्ये अंतर्भूत असताना देखील  शुध्दीकरण यंत्रणा सह नानाविध कारणांमुळे तालुक्यातील जनतेला 'गढूळ पाणीच, प्यावे लागत असून यामुळे ऐन पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार असून याचे सोयरसुतक ना राजकारणांना ना शासनाला ? अशीच परिस्थिती सध्या तरी दिसत आहे.

कल्याण तालुक्यात एकमेव रायते प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उल्हास नदी वर आहे, १९७२ च्या या योजनेवर अनेक गावे व पाडे अंवलबून आहेत. याशिवाय खडवली, दहागांव याही योजना होत्या, पण त्या सध्या वर्ग करण्यात आल्या आहेत. २८४ बोअरवेल ही आहेत. पण तरीही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होतेच, रायते योजना जुनाट व जिर्ण झाल्याने ती कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. मंध्यतरी या योजनेवर २५/३० लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु तरीही गढूळ पाण्यानें काही ग्रामस्थांची पाठ सोडली नाही. योजनेवर शुध्दीकरण यंत्रणा नसल्याने टिसीएल, अलम टाकून पाणी पुरविले जाते. यातील टिसीएल मुळे पाण्यातील जंतू मरतात व अलम मुळे गढूळ पाणी शुध्द होते. मात्र तरीही विविध साथीचे आजार उदभवल्याच्या घटना घडल्या होत्या. प्रत्येक वर्षी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो, यामध्ये लाखो रुपयांची तरतूद करण्यात येते. पण तरीही शुध्द पाणी मिळत नाही. टिसीएल चे प्रमाण अधिक झाल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

कल्याण तालुक्यातील वरप, म्हारळ, जांभूळ सह काही मोजक्या ग्रामपंचायती सोडल्यास औद्योगिक ग्रामपंचायत असलेली कांबा सह बहुतांश ग्रामपंचायत शुद्धीकरण यंत्रणेचा  अभावामुळे गढूळ पाणी प्यावे लागते. हे टाळण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील ४१ गावासाठी सुमारे ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये शुध्दीकरण युनिटचा समावेश आहे. प्रती माणसी ५५ लिटर शुध्द पाणी पुरविणे हे धोरण यामध्ये अंतर्भूत असल्याने तालुक्यात ही कामे प्रगतीपथावर आहेत असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. पण अनेक ठिकाणी कामे थांबली आहेत. गावातील मतभेद, राजकारण, काम मलाच मिळाले पाहिजे असा हट्टाहास, यातून होणाऱ्या तक्रारी, राजकारण्याचा हस्तक्षेप, आमदार, खासदार, मंत्री यांचे होणारे दुर्लक्ष, लोकांच्या प्रश्नापेक्षा अंतर्गत मतभेद, एकमेकांची उणीधुणी काढण्यात धन्यता मानणारे सत्ताधारी ? यामुळे नागरिकांच्या अडचणी,समस्या तशाच राहतात. यातूनच ग्रामस्थावर 'गढूळ पाणी, पिण्याची वेळ येते व यातून विविध साथीच्या आजाराला निमंत्रण दिले जाते व हे वर्षानुवर्षे सुरू आहे. हे जर बदलायचे असेल तर प्रत्येकाने आपला हक्क व कर्तव्य जबाबदारीने पार पाडायला हवे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...