श्री. संजय पाटील मैत्री फाऊंडेशन मुंबई मार्फत रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आयटी माणगाव येथे नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट सेंटर मध्ये ANM, GNM कोर्स चे उदघाटन...
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) - शुक्रवार ०७ जुलै २०२३ रोजी माणगांवचे शिक्षणसम्राट सन्माननीय एडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांच्या खास वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शुभ हस्ते माणगांव तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थांसाठी मुंबई येथील मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि मेडीकल ऑफीसर श्री. संजय पाटील सर यांच्या मार्फत आपल्या रायगड इन्स्टिटय़ूट ऑफ आय.टि. माणगांव येथे माणगांव नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या ट्रेनिंग सेंटर मध्ये A.N.M. (1 वर्षे) व G.N.M. ( 3 वर्षे) चे बेसिक व डीग्री कोर्सेसचे उदघाटन करण्यात आले.
या उदघाटन प्रसंगी सहकारी भूपेंद्र जगताप, रीना चव्हाण, अमोल म्हात्रे, रोशन नाईक, दिक्षित मेस्त्री, सौ.अंकीता मोरे आणि डाॅ.अजय मोरे हे उपस्थित होते. सदर कोर्स सरकारमान्य असुन महाराष्ट्र नर्सिंग काॅन्सील येथे रजिस्ट्रेशन आहे. कोर्सेससाठी बाहेरगांवातील मुला / मुलींची राहण्याची व खाण्याची सुविधा असुन स्काॅलरशिप व एज्युकेशन लोन सुविधा आहे. कोर्सेस पुर्ण झाल्यानंतर नामांकित सरकारी व खाजगी स्थानिक तसेच मुंबई व पुणे येथील हाॅस्पीलमध्ये इन्टरशिपची व्यवस्था केली जाईल. सदर बेसिक व डीग्री कोर्सेस ची पहिली बॅच सुरु झाली आहे.
प्रवेश व अधिक माहितीसाठी :-
पत्ता :- एस.टि.स्टॅन्ड समोर, प्रणव प्लाझा, दुसरा मजला, 204/5, माणगांव- रायगड,402104
संपर्क- रीना चव्हाण मॅडम, मो - 8433507607 9420650438.
No comments:
Post a Comment