Saturday, 8 July 2023

राजकीय 'गटारी, नंतर आता ख-या गटारीचे तळीरामाना वेध, वरुणराजाचे उशीरा आगमन झाल्याने बळीराजा चिंतेत !

राजकीय 'गटारी, नंतर आता ख-या गटारीचे तळीरामाना वेध, वरुणराजाचे उशीरा आगमन झाल्याने बळीराजा चिंतेत !

कल्याण, (संजय कांबळे) : कोकणात रुढ झालेल्या पांरपारिक 'गटारी अमावस्या, ने सध्या हायटेक रुप घेतले आहे, यादिवशी मटण, मच्छी, चिकन, आणि देशी विदेशी दारुचे पँक रिचवत कुठेही कसेही उलटे सुलटे पडायचे? उताणे व्हायचे, चित्रविचित्र चाळे, हावभाव करायचे? असेच काहीसे सध्या राजकारणात झाले असून या चिखलात कोणी कुठे कशा उड्या, कोलांटया मारेल याचा काही नेम नाही. मात्र वरुण राजाने उशीरा आगमन केल्याने बळीराजा चिंतेत आहे, भात लावणी कधी होणार? याची मोठी काळजी त्याला सतावत आहे.

कोकणात भात लावणीच्या वेळी शेतात केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी मोकाट कुत्रे व बाहुल यांच्या पासून सांभाळून ठेवलेल्या' कोंबड्याचे'मटण व वडे गटारी अमावस्या (दर्श अमावस्या) पंरपरा आहे. 

परंतु काळानुरुप हिचे स्वरूप बदलले, ते हायटेक झाले, या अमावास्येनंतर श्रावण महिना सुरू होत असल्याने व या महिन्यात आपण दारु पिणार नाही, असे म्हणून गटारीला मटन, मच्छी, चिकन आणि देशी, विदेशी दारु पिऊन मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला जातो. कोणी कुठे पडतो, उडी मारतो, प्रंसगी जीव गमवतो, तसेच या दिवशी, हाणामाऱ्या, मारामारी, अपघात अशा घटना घडतात म्हणून पोलीस यंत्रणा विशेष बंदोबस्त तैनात करतात. फार्महाउस, नदीकानारे, हाँटेल, धबधबे अशा ठिकाणी हे तळीराम एकत्र येऊन गटारी साजरी करतात.

मटन चिकन सह पापलेट, सुरमई, कोलंबी, बोंबिल, बांगडा, वाम, खेकडे, चिंबुऱ्या आदी मच्छिना मोठी मागणी असते. विशेष म्हणजे तळीराम या गटारीची अगदी आतुरतेने वाट पाहात असतात. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती सध्याच्या राजकारणात दिसून येत आहे. याचा चिखल झाला आहे अशी टिका अनेकांनी केली आहे. लाखो करोडों रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेल्या विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षातील नेत्याने? 'पन्सास खोके, एकदम ओके, माजले बोके, अशा बेंबिच्या देठापासून घोषणा देणारे आज भाजपाच्या मांडीवर बसले आहेत, अर्थात भाजपामध्ये काही धुतल्या तांदळासारखे आहेत असे मुळीच नाही. फोडाफोडिचे राजकारण, एकमेकांवर खालच्या पातळीवर जावून होणारी टिका, इडी, सीबीआय, निवडणूक आयोग, आदी चा वापर यात, गोरगरीब, महागाई, बेकारी, शेतकरी आत्महत्या, याकडे होणारे दुर्लक्ष, सगळ्यामुळे जनता भयानक संतापली आहे. त्यामुळे ही  राजकीय गटारी नव्हे तर काय? असा प्रश्न विचारला जातो आहे. त्यामुळे राजकीय तळीरामांना या गटारीचे वेध लागले असलेतरी पाऊस उशीरा सुरू झाल्याने लांबलेल्या पेरण्या, पाण्यामुळे कुजलेले बी, शेतात पुरेसे पाणी नसल्यामुळे भात लावणीपुर्व ची रखडलेली कामे यामुळे शेतकरी मात्र काळजीत सापडला आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...