Sunday, 9 July 2023

सलग पाचव्या दिवशी चोपडा तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच !!

सलग पाचव्या दिवशी चोपडा तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच !!

चोपडा, (प्रतिनिधी) : सलग पाच दिवसापासून चोपडा तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून यामुळे शेतकरी सुद्धा सुखावला आहे, तालुक्यात खरिपाच्या पेरण्या संपूर्णपणे झाल्या असून कापूस या प्रमुख नगदी पिकाला वर खते देण्याचे व मशागतीचे काम सुरू आहे. आतापर्यंत झालेला पाऊस हा संपूर्णपणे जमिनीत मुरला असून नद्या नाले सरोवर तळे व धरणे मात्र कोरडी दिसून येत आहेत, दमदार पावसाची अपेक्षा असली तरी भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एकदा तरी पाऊस वाहून निघाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...