Sunday, 9 July 2023

मनसेचे खड्यात वृक्षरोपण !!

मनसेचे खड्यात वृक्षरोपण !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरात पाऊस चांगलाच कोसळत असून अनेक ठिकाणी पाणी साचनेचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डे देखील पडले आहे त्यामुळे वाहने संथ गतीने धावत असल्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. घाटकोपर अंधेरी लिंक रोड येथील श्रेयस सिग्नल मस्जिद येथील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने या रस्त्यावरील वाहने खूप संथ गतीने धावत आहेत. त्यामुळे सांयकाळच्या वेळेस या रस्त्यावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागत आहेत. मुंबई महानगर पालिकेने रस्त्यावर एकही खड्डा नसल्याचा दावा केला असला तरी उपनगरात एल बी एस तसेच घाटकोपर अंधेरी लिंक रोड खड्डे काही ठिकाणी दिसून येत असल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खड्यात वृक्ष रोपण करत पालिकेच्या भ्रष्ट कारभार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. मनसेचे माजी शाखाध्यक्ष राजू सावंत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या आंदोलनात मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे, मनसे उपाध्यक्ष दशरथ शिर्के, सुधीर कोलापटे, सुनील लोटनकर, संजय वाघ, शरद भावे, प्रमोद मांढरे आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...