जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार हितेंद्र ठाकूर !!
वसई , प्रतिनिधी : पालघर जिल्हा बुद्धिबळ संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा विवा कॉलेज येथे नुकतीच पार पडली त्यात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी हितेंद्र ठाकूर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत वणे, सचिवपदी युगांत वाळींजकर, सहसचिव निनांत पेडणेकर, मकरंद कानिटकर, खजिनदार विजय उदारे, कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रवीण वनमाळी, प्रशांत आपणकर, सतीश चुरी, दीपक आडे, योगेश चौधरी, आकाश पवार, श्वेता तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, गेली ३२ वर्षे वसई तालुका कला क्रीडा महोत्सवातून अनेक खेळाडू पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे आता पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी सर्व प्रकारचे साह्य करण्यात येईल.
No comments:
Post a Comment