लोकनियुक्त सरपंच लता वारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षलागवड !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
उधळे वाकडपाडा ग्रामपंचायत च्या लोक नियुक्त सरपंच स लता वारे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हट्टीपाडा गावात वृक्षारोपण केले. आपला वाढदिवस वृक्ष लागवड करुन साजरा केला या मुळे निसर्ग संवर्धनाचा संदेश या माध्यमातून सरपंचांनी दिला आहे असे प्रतिपादन प्रदीप वाघ उपसभापती यांनी केले.
तसेच सरपंच लता वारे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप वाघ उपसभापती, संजय वाघ माजी सरपंच, नंदकुमार वाघ उपसरपंच, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, गणेश खादे सदस्य, मोहिनी वाघ ग्रामपंचायत सदस्य, सखाराम शिद, पांडुरंग वारे, अण्णा लहामगे, सोमा शिद, प्रितम लहामगे, दिपक वारे, पांडुरंग मेंगाळ, रवि वारे, सोमनाथ शिद इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment