Monday, 10 July 2023

आमडोशी येथे शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

आमडोशी येथे शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) - रविवार दिनांक ९ जुलै रोजी मुक्काम आमडोशी पोष्ट पेण/तळे, तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील रायगड  जिल्हा परिषद शाळा आमडोशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि गावातील इतर महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सकाळी ठीक 9 वाजता मा.श्री हेमेंद्र पाटोळे यांच्या सौजन्याने श्री कालभैरव नवतरुण मंडळ, ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ आणि महिला मंडळ यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या.
      शाळेतील मुख्याध्यापक- श्री उभारे सर आणि सहशिक्षक बक्कम सर ,आरसे सर, पाटील बाई, शाळा व्यवस्थापन कमिटी यांनी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रम बदलेल्या शैक्षणिक वर्षाच महत्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिव्या. तसेच आमडोशी नवतरुण सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ यांनी श्री कालभैरव मदत निधी ट्रस्ट यांच्या आणि मुंबईकर मंडळ ग्रामस्थ यांच्या साहाय्याने या वर्षी दुसऱ्यांदा सकाळी 11 वाजता वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला. यात त्यांनी विविध आंबा, काजू, फणस, वड, पिंपळ, कडुनिंब अश्या प्रकारची वृक्ष लावली आणि एक हिरव्या भविष्याला चालना दिली. आणि एक पर्यावरणासाठी हिरवा कंदील देण्याचा संदेश या आमडोशी गावच्या तरुणांनी  इतर तरुणांसाठी निर्माण केला. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून आलेले नवतरुण मंडळ ,मुंबईकर ग्रामस्थ ,महिला मंडळ, शाळेतील शिक्षक आणि व्यवस्थापन कमिटी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...