Monday, 10 July 2023

अनाधिकृत शाळावर नोटीस कारवाईचा सोपस्कार, दुसरीकडे जिल्हा शाळांची दयनीय अवस्था, लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य भंगारात ?

अनाधिकृत शाळावर नोटीस कारवाईचा सोपस्कार, दुसरीकडे जिल्हा शाळांची दयनीय अवस्था, लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य भंगारात ?

कल्याण, (संजय कांबळे) ::ठाणे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागाने जिल्ह्यातील ३३ शाळा अनाधिकृत असल्याचे जाहीर केले. यांच्या वर १ लाख रुपये व १० हजार रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे ही प्रसिद्धी च्या माध्यमातून सांगून टाकले. परंतु या शाळावर केवळ नोटीस बजावून कारवाईचा सोपस्कार उरकल्याचे दिसून येत आहे, आजही यातील अनेक शाळा बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे आधीच दयनीय अवस्था झालेल्या या शाळामधील शैक्षणिक साहित्य पावसाने भिजत असून लवकरच ते भंगारात जमा होईल असे वाटते.

ठाणे जिल्ह्यात ३३ शाळा या अनाधिकृत म्हणून जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागाने जाहीर केले आहे. या शाळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. कल्याण तालुक्यात १० शाळा या अनाधिकृत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९(१) मधील तरतुदी नुसार शाळा व्यवस्थापनाला १ लाख रुपये दंड व नोटीस दिनांकापासून बंद न केल्यास पुढील प्रत्येक दिवशी १० हजार रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकां-यांनी सर्व शाळांना नोटीस बजावली तर जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ बाबासाहेब केरकर यांच्या म्हणण्यानुसार काही शाळावर एफआयआर दाखल केले आहेत. मात्र यानंतरही काही शाळा सुरू आहेत. तर कल्याण गटशिक्षणाधिकारी डॉ खोमणे यांना पत्रकार भेटले असता आपल्या केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार १० पैकी ९ शाळा बंद आहेत. केवळ एक शाळा सुरू आहे असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात अनेक शाळा सुरू असल्याचे दिसून आले.

तथापि एका बाजूला या शाळावर कारवाई होत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या काही शाळांची खूपच दयनीय अवस्था बघायला मिळत आहे. तुटलेले व गळके पत्रे, उखडलेल्या खिडक्या, दरवाजे, फुटलेली कौले, तडे गेलेल्या भिंती, पडलेले छप्पर, यामध्ये पावसाने भिजणारे संगणक, बेंच व इतर हजारो रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य, अशा काहीशी परिस्थिती तालुक्यातील जिप शाळाची झालेली आहे. काही शाळाना संरक्षक भिंत आहे तर शाळा कोसळण्याच्या स्थितीत आली आहे. काही शाळा ना भिंती असून नसल्यासारख्या आहेत. मध्यतंरी पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांनी काही शाळाना भेटी दिल्या तेव्हा अनेक त्रुटी त्यांना आढळून आल्या होत्या.

अशा शाळेत पट संख्या कशी वाढणार, तरीही काही शिक्षक व शाळा या गुणवत्ता पुर्ण ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.

याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेहेर यांना विचारले असता ते म्हणाले, तालुक्यातील काही शाळाची अवस्था बिकट आहे, अशातच शिक्षक कमी आहेत. मग पालक कसे या शाळेत मुलांना पाठवतील, जिल्हा परिषद शाळांना सोईसुविधा मिळत नसतील तर शैक्षणिक बजेट कुटे जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ बाबासाहेब केरकर यांना वारंवार संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...