बळीराज सेनेच्या उपनेते पदी आणि मुंबई उपाध्यक्ष पदी 'कोकण भूमिपुत्र श्री.रमेश कानावले' यांची नियुक्ती !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष बळीराज सेना याची आज पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व श्री.अशोक वालम साहेब यांच्या अध्यक्षतेखालील संघाध्यक्ष भूषण बरे साहेब व संघ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.९ जुलै २०२३ रोजी गावस्कर हाॅल, दादर पूर्व, मुंबई येथे हजारो कार्यकर्त्यां समोर जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये उपनेते पदी आणि मुंबई उपाध्यक्ष पदी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील श्री क्षेत्र मार्लेश्वर पासून जवळच असलेल्या बामणोली गावचे सुपुत्र, कोकण भूमिपुत्र श्री.रमेश कानावले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईसह उपनगर आगामी महानगर पालिका, जिल्ह्य परिषद, लोक सभा, विधान सभा निवडणूकी करीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये २२७ वार्ड लढविण्यासाठी भविष्यात उमेदवाराची चाचपणी देखील लवकरच केली जाईल असे मुंबई उपाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर श्री. रमेश कानावले यांनी बोलताना आवर्जून उल्लेख करून सांगितले.त्यांच्या या नियुक्ती बद्दल कोकणातील अनेक सामाजिक संघटना, समाज शाखा, मंडळ, राजकीय मित्र मंडळी, मित्र परिवार यांनी कानावले यांना अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment