Saturday, 22 July 2023

पावसाळ्या पूर्वीच नाले सफाई न झाल्याने घरांमध्ये गटाराच पाणी शिरल्याने रहिवाशी संतप्त !

पावसाळ्या पूर्वीच नाले सफाई न झाल्याने घरांमध्ये गटाराच पाणी शिरल्याने रहिवाशी संतप्त !

मुंबई, (निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर) :

          मुंबई महानगर पालिका प्रशासना कडून पावसाळयापूर्वी होणारी नाले सफाई न झाल्यामुळे नाले, गटारातील घाण पाणी घरात शिरल्याने वडाळा पूर्व आनंदवाडी येथील रहिवशांना त्रास सहन करावा लागतो आहे. हा त्रास दर वर्षीच सहन करावा लागत आहे, त्यामुळे येथील रहिवाशी अशा परिस्थितीला कंटाळले आहेत. मुंबईत गेले दोन दिवस सतत पाउस पडत आहे त्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते आणि आनंदवाडी, पंचशिला नगर, बरकत अली नगर, गौतम नगर तसेच सर्वात महत्वाचे बरकत अली नगर, गौतम नगर, पंचशील नगर या विभागांचे संपूर्ण नाल्यांचा आणि पावसाचं पाणी आनंदवाडी विभागांमधून जात असत पण ह्या ठिकाणी नाल्यांची सफाई न झाल्यामुळे आणि पाणी जाण्यासाठी मोठा मार्ग मोकळा नसल्यामुळे हे पाणी आनंदवाडी मैदान आणि त्या परिसरात साचले जाते. आणि तेच पाणी तेथील घरांमध्ये शिरून जनजीवन विस्कळित होते. अशाने रोगराई पसरण्याची मोठी शक्यता आहे. 

               मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी काय काम केले ? आणि कुठे झाली नालेसफाई ? शेवटी आमच्या विभागात थोड्याच पावसाळ्यात पण नाले तुंबून जातात. अजून तर पावसाळ्यातील जवळजवळ ३ महिने बाकी आहेत. शासकीय अधिकारी  इकडे लक्ष देतील का ? अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी यांच्याकडून येतं आहेत.
                तसेच इतक्या सगळ्या विभागातील पाणी आनंदवाडी मध्ये येते आणि त्याचा उपसा करण्यासाठी फक्त एकच पंप  या विभागात लावण्यात आला आहे. तरी तो  पंप  संपूर्णपणे सक्षम नसून आनंदवाडी विभागात पावसाळ्याचे पाणी बाहेर फेकण्यासाठी किमान दोन पंपांची अपेक्षा रहिवाशांना होती. 
                 आर जे गायकवाड (दादा) मार्ग वडाळा (पूर्व) मुंबई: ३७ येथील गटार नाल्यांची प्रत्येक पावसाळ्यात पुर्वी साफ सफाई केली जाते. पण २०२३ चा पावसाळा येण्याअगोदर या विभागातील कोणत्याही गटार नाल्यांची साफ सफाई झाली नाही. तसेच गटारावरील झाकणे देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यावर नवीन झाकणं लावण्याची व्यवस्था केलेली नाही. ठिकाणी लहान मूल खेळत असतात. अशाने कोणतीही दुर्घटना घडू शकते. तरी प्रशासनाने त्वरित उपाय योजना करावी अशी मागणी आनंदवाडी विभागातील रहिवाशी आणि आनंदवाडी रहिवासी सेवा संघ (रजि.) चे अध्यक्ष महेंद्र आर. गायकवाड यांनी केली आहे.

1 comment:

  1. धन्यवाद आमच्या समस्यांची तक्रार आपण नोंद घेतल्याबद्दल 🙏

    ReplyDelete

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...