खडतर प्रवासातून कु.अजय रघुनाथ जौरत बनला चार्टर्ड अकाउंटंट (CA) !!
*शिपोळे कुणबी समाज मंडळ मुंबई तर्फे सत्कार*
*रायजीबाई धोंडु शिंदे प्रतिष्ठान तर्फे कु. अजय रघुनाथ जौरत यांचे सत्कार*
मुंबई, (जितेंद्र शिंदे/दीपक मांडवकर) :
सी. एन. हायस्कूल (चिमनलाल) सांताक्रुझ मुंबई येथे रघुनाथ जौरत यांचे सुपुत्र कु.अजय रघुनाथ जौरत हा चार्टर्ड अकाउंटंट (CA) परिक्षेत उत्तीर्ण झाला.गरिबीची जाण ठेऊन आई वडिलांच्या कष्टाला सोन्याचा कळस चढवला.त्याच प्रमाणे शिपोळे गावाचा देखील मान अभिमानाने उंचावेल असे कार्य करून या गावातील तरुणांनसाठी एक वेगळा आदर्श कु.अजय रघुनाथ जौरत यांनी निर्माण केला.त्यासाठी शिपोळे कुणबी समाजा तर्फे सत्कार करण्यात आला.त्यावेळी शिपोळे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष गंगाराम शिंदे, उपाध्यक्ष दत्ताराम खैरे, कार्याध्यक्ष रघुनाथ जौरत, सेक्रेटरी नरेश जौरत, खजिनदार सुधाकर भागणे, उप खजिनदार रूपेश भागणे, आणि समाज बांधव उपस्थित होते.
तसेच रायजीबाई धोंडु शिंदे प्रतिष्ठान तर्फे ही अजय यांचे सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रतिष्ठानचे परिवारातील सदस्य उपस्थित होते. या सत्कार समारंभ सोहळ्याचे उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रमोद महादेव मालप यांनी केले, सत्कार समयी अजय याने आपल्या समाज बांधवांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment