Monday, 7 August 2023

बुलढाण्यात २५ क्विंटल रेशनचा तांदूळ साठा जप्त, भिवंडीतील ग्रामीण भागातही टोळी सक्रिय !

बुलढाण्यात २५ क्विंटल रेशनचा तांदूळ साठा जप्त, 
भिवंडीतील ग्रामीण भागातही टोळी सक्रिय !
 
भिवंडी, दिं,८,अरुण पाटील, भिवंडी (कोपर) :
          बुलढाण्यात रेशन दुकानातून व रेशन लभर्थ्याकडून चोरून धान्य खरेदी करून तो साठवणूक करून नंतर तो काळ्या बाजारात चढ्या भावात विक्रीसाठी ठेवलेला २५ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जप्त केला आहे. अश्याच प्रकारे धान्याचा काळा बाजार करणारी टोळी भिवंडी येथील  ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठण्याच्या व पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदाम पट्टयात कार्यरत असून ही टोळी ठाणे जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातून व लभार्थ्याकडून चोरून धान्य खरेदी करून नंतर त्यावर प्रक्रिया व पॉलिश करून हेच धान्य चढ्या भावाने कित्येक वर्ष पासुन बाजारात विक्री करत असल्याचे बोलले जात आहे.मात्र आज पर्यंत या धान्य माफियांवर कुठलीच ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने संशय व्यक्त होत आहे 
           भालेगाव बाजार मार्गावरील एका गोदामात साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून छापा मारला असता गोदामात साठवणूक करण्यात आलेला ५७ कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला आहे. खामगाव तालुका पुरवठा विभाग आणि पिंपळगावराजा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. तांदळाचा साठा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.
           पोलिसांनी जप्त केलेला तांदळाचा हा साठा सय्यद आरीफ सै. हकीम या आरोपीचा असून त्याच्या विरोधात पिंपळगाव राजा पोलिसांत पुरवठा निरीक्षक विशाल भगत यांनी तक्रार दाखल केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...