पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त अनाथ मुलांना पावसाळी व शैक्षणिक साहित्य वाटप !
कल्याण, प्रतिनिधी :
राष्ट्रीय पत्रकार महासभा संघटनेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नारायण सुरोशी व त्यांचे सहकारी संपादक /पत्रकार सचिन बुटाला यांच्या संकल्पनेतून म्हसकळ, टिटवाळा येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित अनाथ मुलांच्या आश्रमशाळेत त्यांना आवश्यक अशा पावसाळी व शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविले. पत्रकार संघाच्या या उपक्रमासाठी त्यांनी कल्याण पश्चिम चे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार विश्वनाथ भोईर यांची भेट घेतली, माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांना ही कल्पना आवडली व त्यांनी त्यासाठी सहकार्य केले.
जीवन संवर्धन फाउंडेशन यांच्या म्हसकळ, टिटवाळा येथील आश्रमात अनेक गरीब व बेघर कुटुंबातील मुलांना आश्रय देऊन त्यांना शिक्षण व संस्कार दिले जातात, त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होते. या आश्रमात आज ७० मुले शिक्षण घेत आहेत. याची माहिती पत्रकार नारायण सुरोशी यांना होती, त्यांनी या आधीही यांना शक्य त्या स्वरूपात मदत केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले यात त्यांनी मुलांना रेनकोट, छत्री, वह्वया, पेन व इतर साहित्य यांचे वाटप केले, हा कार्यक्रम कल्याण पश्चिम माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख सुदाम दादा पाटील, टिटवाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित दोरकर, डॉक्टर चारुलता इंगळे हे उपस्थित होते, तसेच संपादक / पत्रकार सचिन बुटाला, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नारायण सुरोशी, कार्याध्यक्ष सुभाष पटनाईक, सचिव सुरेश उगले व ठाणे जिल्हाध्यक्ष सौ. मिनल पवार, युवा पत्रकार केशव भालेराव तसेच इतर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
जीवन संवर्धन फाउंडेशन, म्हसकळ (टिटवाळा, कल्याण)
सदाशिव चव्हाण (संस्थापक, अध्यक्ष)
संपर्क - +91 75069 27704
No comments:
Post a Comment