पत्रकार नारायण सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!
कल्याण, प्रतिनिधी
राष्ट्रीय पत्रकार महासभा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, पत्रकार नारायण सुरोशी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून संघटनेने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते.
पत्रकार नारायण सुरोशी हे कल्याण येथील जेष्ठ पत्रकार असून आज त्यांना आदराचे स्थान आहे.
यांच्या वाढदिवसानिमित्त रायते येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यानंतर टिटवाळा, म्हसकळ येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित गरीब व बेघर मुलांच्या आश्रमशाळेत पावसाळी साहित्य (रेनकोट, छत्री) व शैक्षणिक साहित्य, वही, पेन तसेच इतर यांचे वाटप केले, यावेळी ठाणे उपजिल्हाप्रमुख (शिवसेना) सुदामदादा पाटील, पोलिस निरीक्षक रणजित दोरकर, डॉक्टर चारुलता इंगळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून तर सहकारी संपादक / पत्रकार सचिन बुटाला, राष्ट्रीय पत्रकार महासभा संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पटनाईक, सचिव सुरेश उगले, ठाणे जिल्हाध्यक्ष सौ. मिनल पवार, युवा पत्रकार केशव भांगरे तसेच अनेक पत्रकार व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा, लव्हाळी, बदलापूर येथील आदिवासी मुलांना सुध्दा रेनकोट, छत्री, वही, पेन व इतर साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी पुर्ण महाराष्ट्रात ज्यांना सर्वात अधिक कार्यक्षम आमदार म्हणून ओळखले जाते, विकासनील मुरबाड मतदार संघाचे आमदार माननीय किसन कथोरे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे उपजिल्हाप्रमुख (शिवसेना) सुदाम दादा पाटील व रविंद्र घोडविंदे सर (संपादक - दैनिक जिवनदीप वार्ता, अध्यक्ष जिवनदीप कॉलेज, गोवेली) हे सन्मानिय अतिथी म्हणून उपस्थित होते, यावेळी संपादक / पत्रकार सचिन बुटाला, राष्ट्रीय पत्रकार महासभा संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पटनाईक, सचिव सुरेश उगले, ठाणे जिल्हाध्यक्ष सौ. मिनल पवार, युवा पत्रकार केशव भांगरे तसेच अनेक पत्रकार व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माननीय आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार नारायण सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना संदेश दिला.
पत्रकार नारायण सुरोशी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून अनेकांनी शुभेच्छा देत त्यांच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.
अभिनंदन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्रकार साहेब माझी एक विनंती आहे माझी आई काशीबाई वाळू सुरोशे व तिचा भाऊ अण्णा बाळू सुरोशे हे दोघे बाळू पदु सुरोशी यांचे पुत्र व कन्या माझ्या आईचे तुमच्या ग्रामीण मध्ये नावाची नोंद कुठल्या दप्तरी असेल ते नाही मला आपल्या पत्रकार तर्फे ही बातमी मला गावात जाहीर करायची आहे तर आपणास विनंती आहे आपण यासाठी मला मदत करावी रायते गाव या दप्तरी माझ्या आईच्या नावाबद्दल शोध घेणे आपण सर्व नातेवाईक आहोत ते सिद्ध करण्यासाठी कागदपत्र पाहिजेत तुमच्याकडून काही मदत झाली तर खूप खूप बरं होईल जय हिंद जय महाराष्ट्र
ReplyDelete