दणका, बातमीचा काम समाजाजाचे? गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या ड्रेनेज चे काम सुरू, अनेकांकडून समाधान व्यक्त !!
कल्याण, (प्रतिनिधी) : गेली २०/२५ वर्षे समाजाभिमुख पत्रकारिता करणारे पत्रकार संजय कांबळे यांनी तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयातील गैरसोय बातमीच्या माध्यमातून कालच समोर आणली होती, याचा इतका जबरदस्त परिणाम झाला की, आज सकाळीच रुग्णालयाच्या ड्रेनेज चे काम सुरू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या ४/५ महिन्यापासून रुग्णालयात येणारे शेकडो पेंशट, त्यांच नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग व नर्सेस यांची या गैरसोयीमधून सुटका होणार असल्याने त्यांनी पत्रकार संजय कांबळे यांचे आभार मानले आहे.
कल्याण तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती भागात १९९२च्या आसपास ग्रामीण रुग्णालय सुरू झाले, जवळपासच्या ७०/८० गावातील नागरिकांना मोठा आधार मानला जातो, सुमारे ३० बेडच्या आसपास हे रुग्णालय असल्याने येथे अनेक रुग्णावर औषधोपचार होत आहे, शिवाय छोट्या मोठ्या आजारावर परिणामकारक उपाययोजना केली जाते. त्यामुळे सदैव या रुग्णालयात रुग्णांचा राबता असतो, मात्र अशा अंत्यत महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या ४/५ महिन्यापासून शौचालये बंद करून ठेवण्यात आली होती, ड्रेनेज चे लाईन खोदून ठेवल्याने सर्व चँक अप झाले होते. वार्डातील बाथरूम, तसेच बाहेरील बाथरूम घाणीने भरल्याने असल्याने परिसरात दुर्गंधी पसरुन अस्वच्छता दिसून येत होती. यामुळे पेंशट व त्यांचे नातेवाईक विशेष करून महिला, मुली, यांची मोठ्या कुंचबना होत होती. शिवाय कर्मचारी व अधिकारी यांची ही मोठी गैरसोय होत होती.
वैद्यकीय प्रशासणाने याबाबत वरीष्ठांना पत्र व्यवहार केला होता, मात्र कारवाई शुन्य, त्यामुळे तेही हथबल झाले होते.
आश्चर्याची बाब म्हणजे अनेक कार्यकर्ते, नेते, पुढारी, तथाकथित समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व त्यांचे स्वंयमघोषित प्रतिनिधी हे या रुग्णालयात येवून ही परिस्थिती बघत होते.रुग्ण कल्याण समिती फलकावर झळकत होती, मात्र प्रत्यक्षात कृती काहीच नाही. अखेरीस तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे यांनी ही परिस्थिती पाहून विषयाचे गांभीर्य ओळखून आपल्या दैनिक, सागर, लोकदिशा, महाभारत, नवनगर, माझा बातमीदार, आदी विविध वृतपत्रातून बातमी प्रसिद्ध केली. शनिवार, रविवार,आणि सोमवार असे तीन दिवस बातमी येताच आज सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारीने ड्रेनेज चे काम सुरू केले.
त्यामुळे हा दणका सर्वानाच आश्चर्याचा वाटत आहे. गेल्या ४/५ महिन्यापासून रखडलेला प्रश्न तात्काळ सुटल्याने गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पंदारे, सहाय्यक अधीक्षक संजय डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ उज्वल जाधव, नर्सेस, कर्मचारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, पोलीस पाटील संघटनेचे विलास हरड, अँड, सुनील गायकर, मधुकर रोहणे, वंचित चे किशोर पंडित, आदींनी पत्रकार कांबळे यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment