Saturday, 16 September 2023

जिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन !!

जिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन !!

*स्पर्धेत सहभागी होण्याचे डॉ.भरत बास्टेवाड यांचे आवाहन*
 
रायगड, प्रतिनिधी :- गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंडळे, व्यक्ती, संस्था, बचत गट तसेच ग्रामपंचायती यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

यासाठी https://tinyurl.com/ganeshraigad2023 या गुगल लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. या गुगल लिंक वर गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ अपलोड करावयाचे आहेत. फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन पाणी व स्वच्छता विषयी जनजागृतीसाठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्स, बॅनर्स, पोष्टर द्वारे जनजागृती करणे श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन कृत्रिम तलावात गणेशा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन देणे आदी उपक्रम करणे अपेक्षित आहे.

स्पर्धेसाठी तांत्रिक सहाय्य व परीक्षण करण्याकरिता जिल्हा स्तरावरून परीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. स्पर्धेचे निकष पूर्ण करणाऱ्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना बक्षीस म्हणून प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी पंचायत समिती मधील गटसमन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.

केंद्र शासनाने स्वच्छता ही सेवा अभियान सुरु केले आहे.  त्यामध्ये कचरामुक्त भारत हा उद्देश असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण पूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...