Tuesday, 10 October 2023

मानपाडा पोलिसांची कारवाई, सेक्स रॅकेट उद्धवस्त, ७ बांगलादेशी महिलांची सुटका, ५ दलालांसह घरमालकास अटक !!

मानपाडा पोलिसांची कारवाई, सेक्स रॅकेट उद्धवस्त, ७ बांगलादेशी महिलांची सुटका, ५ दलालांसह घरमालकास अटक !!


डोंबिवली, मिनल पवार : बांग्लादेशमधून महिलांना फुस लावून त्यांना डोंबिवली येथे आणून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले जात असल्याची बाब मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पुणे येथील फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेकडे प्राप्त माहितीनुसार त्यांच्या कार्यालयास 5 ऑक्टोबर रोजी बांग्लादेशमधून एक ईमेल आला.

या ईमेल मध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहाण्याने बांग्लादेश हून भारतात आणले आहे. ती मुलगी डोंबिवलीत असून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ठाणे येथे येऊन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागास याची माहिती दिली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग ठाणे व मानपाडा पोलीस पथकाने श्री. दत्तात्रय शिंदे मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. सचिन गुंजाळ, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण, श्री. सुनिल कुराडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली यांचे मार्गदर्शनाखाली हेदुटणे गांवातील विठ्ठल रूक्मीणी मंदीराजवळ असलेल्या घर क्रमांक ३२ मध्ये रात्री १२ वा. सुमारास छापा टाकला असता सदर घराच्या तळमजल्यावर पिडीत महीला व तिच्यासोबत इतर ६ बांगलादेशी महीला मिळुन आल्या. पोलीसांनी पिडीत महीलांकडे विचारपुस केली असता युनुस शेख उर्फ राणा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या सर्व महीलांना नोकरीचे व उपचाराचे अमिष दाखवुन बांगलादेशातुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे गांवामध्ये डांबुन ठेवल्याचे समजले. तसेच या महीलांना इतर पुरूषासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध करण्यास लावुन त्याबदल्यात राणा व त्याचे साथीदार लोकांकडुन पैसे घेत असल्याचे सर्व महीलांनी पोलीसांना सांगितले. राणा व त्याचे साथीदार पलावा सिटी मध्ये असल्याचे पोलीसांना पिडीत महीलांनी सांगितल्यानंतर पोलीसांनी पलावा सिटी मध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले. आरोपींना पोलीसांचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा घेवुन अंतर्ली गांवाबाहेर असलेल्या झाडीझुडपामध्ये पळुन गेले. झाडीमध्ये अंधार असल्यामुळे तसेच आरोपीची संख्या जास्त असल्यामुळे मानपाडा पोलीसांनी आणखी मनुष्यबळ व टॉर्च मागवुन रात्री २ वा. ते पहाटे ६ वा. दरम्यान आरोपींचा अंतर्ली गांवाबाहेरील झाडीझुडपामध्ये शोध घेवुन ५ आरोपीला पकडले. युनूस अखमल शेख उर्फ राणा, (वय 40), साहिल मिजापुर शेख (वय 26 ), फिरदोस नुर हुसेन सरदार (वय 24), आयुबअली अजगरअली शेख (वय 35), बिपलॉप हापीजूर खान (वय 24) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

सदर कारवाई मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे, पोनि / सुरेश मदने, पोनि / राम चोपडे, पोनि / दत्तात्रय गुंड, सपोनि / अविनाश वनवे, सपोनि / सुनिल तारमळे, सपोनि / प्रशांत आंधळे, सफी / संतोष चौधरी, पोहेकॉ / राजेंद्र खिलारे, पोहेकॉ / संजु मासाळ, पोहेकॉ / सुनिल पवार, पोहेकॉ / विकास माळी. पोहेकॉ / शिरीष पाटील, पोहेकॉ / दिपक गडगे, पोना / यल्लप्पा पाटील, पोना / देवा पवार, मपोहेकॉ / इरपाचे, पोना मंदार यादव, पोकों / महेंद्र मंझा, पोकों/ बहीरम, पोकॉ/राठोड, पोकॉ/जाधव, पोकों/नरूळे पोकॉ/ विजय आव्हाड, पोकॉ/ अशोक अहेर, व सफौ/धनंजय मोहीते, सफौ/दिपक भोसले (A.H.T.U THANE) या पोलीस पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...