नवरात्रीच्या पहिल्या माळेला केली सपत्नीक पूजा !!
कल्याण , नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवलीचा भरभरून विकास होऊ दे अशी प्रार्थना कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दुर्गाडी देवीचरणी केली. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आज पहिल्या माळेला आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांनी सपत्नीक दुर्गाडी देवीची पूजा केली. त्यावेळी आपण ही प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणात दुर्गाडी किल्ल्यावर असणारी दुर्गादेवी हे कल्याणची जागृत ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात या देवीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत कल्याणकरांकडून अखंडपणे या देवीची पूजा अर्चना सुरू आहे. शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून कल्याण पश्चिमेचे आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांनी त्यांच्या पत्नी सौ.वैशालीताई विश्वनाथ भोईर यांच्यासह सहकुटुंब दुर्गाडी देवीचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी त्यांनी सांगितले की विद्यमान सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यांच्याकडून कल्याण डोंबिवलीतही विकासकामांसाठी मोठा निधी देण्यात आला असून कल्याण पश्चिमेमध्ये अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे येत्या काळात कल्याण डोंबिवलीचा भरभरून विकास होईलच यात कोणतेही दुमत नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
No comments:
Post a Comment