Saturday, 14 October 2023

गांजाची तस्करी करणाऱ्या उपनिरीक्षकाला अटक !

गांजाची तस्करी करणाऱ्या उपनिरीक्षकाला अटक !

भिवंडी, दिं,१४, अरूण पाटील (कोपर) :
उत्तरप्रदेशातील  एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.त्यांच्या ताब्यातून 33 किलो चरस जप्त करण्यात आले. रवींद्र शुक्‍ला असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शुक्‍ला हे उपनिरीक्षक म्हणून गोरखपूर मध्ये कार्यरत आहेत. शुक्‍ला आणि त्याचा सहकारी कुलवीर सिंग यांनी नेपाळमधून चरस (गांजा) आणला, असे पोलिस अधीक्षक के के विश्नोई यांनी सांगितले.

या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली. गोरखपूर  आणि महाराजगंज पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत कोट्यवधी रुपयांची आहे.

येथील तस्करीला पोलिसांचाच आर्शिवाद असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. तो आरोप या निमीत्ताने खरा ठरत आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...