जिजाऊ संस्थेच्या MPSC/UPSC मोफत वाचनालयातील ९ विद्यार्थी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण !
पालघर, अजय शेलार :
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेच्या लागलेल्या निकालात जिजाऊचे ९ विद्यार्थी उतीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत चालवण्यात येत असलेल्या यूपीएससी/ एमपीएससी अकॅडमीतल्या ९ विद्यार्थ्यानी उज्ज्वल कामगिरी केली आहे. जिजाऊ संस्थेच्या मोफत चालवण्यात येत असलेल्या यूपीएससी/ एमपीएससी अकॅडमीतील सुविधांचा लाभ घेऊन विविध ठिकाणी असलेल्या या वाचनालयातील विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. यामध्ये विक्रमगड तालुक्यातील झडपोली वाचनालय येथून शैलेंद्र भावर, विशाल दिवा, बुद्धभूषण निकाळजे, नागनाथ लाड, रामेश्वर चव्हाण, विवेक चौधरी, रोहन तावरे, गोविंद घोडके तर जव्हार वाचनालयातून ललित मौले यांनी यश सम्पादन केले आहे.
ठाणे – पालघरसह इतर अनेक दुर्गम भागांत अनेक मुलं मुली असे आहेत की त्यांच्यात गुणवत्ता आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना अधिकारी होण्याचे स्वप्न मनात असूनही ते स्वप्न पूर्ण करता येत नाही. मग सर्वसाधारण नोकरीकडे हे तरुण वळतात. हि सगळी परिस्थिती बदलावी आणि आपल्या गाव तालुक्यातूनही अधिकारी घडावेत. गाव तालुक्याचा विकास व्हावा म्हणून २००८ पासून जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था ही विविध माध्यमांतून ठाणे, पालघर, कोकणातल्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी मोफत यूपीएससी / एमपीएससी अकॅडमी, पोलीस अकॅडमी, JEE, NEET, स्पर्धा परीक्षा मोफत क्लासेस आदी उपक्रम जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे स्वखर्चाने राबवत आहेत. सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग आहे. भविष्यातील करीयरच्या आव्हानांसाठी इथल्या गुणवत्ता असलेल्या ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी, त्यांनी तयार व्हावे यासाठी संस्था विविध ठिकाणी अनेक या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.
या उपक्रमांचा लाभ या भागांतील असंख्य मुला मुलींनी होत आहे. आज येथील अनेक विद्यार्थी विविध स्तरांवर चांगल्या पदांवरती शासकीय सेवा बजावत आहेत. आजतागायत हजारोंच्या संख्येने अधिकारी घडत आहेत. तर आयपीस पर्यंत देखील काहींनी मजल मारली आहे त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने पोलीस भरतीत येथील मुला – मुलींची निवड झाली आहे. तर यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जिजाऊ पोलीस अकॅडमीचे हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड झाली असून या भरतीमधील रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट दिला आहे.
या भागांतील मुलांनी केवळ शिपाई, कारकून म्हणून नोकरी न करता वेगवेगळ्या उच्च पदांवरती त्यांनी आपला लौकिक मिळवावा. आपल्या मातीतल्या माणसांना योग्य न्याय देण्यासाठी आपल्या मातीतले अधिकारी घडले पाहिजेत. हे ध्येय बाळगून जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र काम करत आहेत. जिजाऊ MPSC/UPSC च्या ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकण भागांत ४४ अभ्यासिका मोफत चालविल्या जातात. त्या सगळ्याचा गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपली स्वप्न पूर्ण करावीत असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले.
No comments:
Post a Comment