Saturday, 14 October 2023

साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे आश्रमशाळा मान विक्रमगड येथे अन्नदान व शालेय साहित्य वाटप !!

साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे आश्रमशाळा मान विक्रमगड येथे अन्नदान व शालेय साहित्य वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :
             साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबई यांच्या कडून पितृपक्षातील अन्नदान कार्यक्रम यावर्षी आश्रमशाळा मान विक्रमगड जिल्हा पालघर येथे पार पडला. यावेळी अन्नदान कार्यक्रमात  मुलांना खाऊ व शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. 

            साईपरिवराचे सर्वश्री. मंगेश अंकुश रासम, ट्रस्टी अनिल वडके, उमेश मांजरेकर, शरद नाक्ती, प्रशांत पिल्ले, विनोद इंगावले, विनायक सावंत आणि सौ. मनीषा रासम, आदिवासी आश्रम शाळेचे यशवंत वातास सर, आदिवासी मित्र तुळशीदास तांडेल, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांनी ही या कार्यात सहभाग घेतला होता.साई परिवार सेवा भावी ट्रस्ट कांदिवली मुंबई यांच्या या कार्याचे विभागात कौतुक होत असून अनेकांनी त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...