Saturday, 14 October 2023

रायता येथील संत आसाराम बापू आश्रमात सर्वपित्री अमावस्येनिमित्त हजारो श्रध्दाळूचे सामूहिक पिंडदान !!

रायता येथील संत आसाराम बापू आश्रमात सर्वपित्री अमावस्येनिमित्त हजारो श्रध्दाळूचे सामूहिक पिंडदान !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील रायता येथील संत आसाराम बापू आश्रमात सर्वपित्री अमावस्ये निमित्ताने सुमारे २ ते ३ हजार श्रध्दाळूनी यामध्ये महिला, पुरुष, वयोवृद्ध यांनी सामुहिक पिंडदान हा सोहळा केला. वर्षांपासून एकदाच अशाप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. 

धर्म आणि संस्कृती याचा प्रसार, प्रचार व्हावा म्हणून पूज्य संत आसाराम बापू यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. देशभरात त्यांचे ४५० आश्रम आहेत. त्यांच्या प्रेरणेतून धर्म व संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, याकरिता विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यानुसार पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी पिंडदान केले जाते, त्यामुळे आज रायता आश्रमात सामूहिक पिंडदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता मुंबई, नाशिक, नगर, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, आदी भागातून सुमारे दोन ते तीन हजार श्रध्दाळू रायता येथे आले होते.

यावेळी भजन, किर्तन, संत्सग आयोजित केला होता. संत आसाराम बापू आश्रमाच्या वतीने पूजा साहित्य, भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये महिला, पुरुष, वयोवृद्ध लोकांनी सहभाग घेतला होता. यामुळे आश्रम परिसरात भक्तिमत वातावरण निर्माण झाले होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल गुफ्ता, सतेंद्र भाई, कैलास भाई, सुनील नागपाल, हे सहभागी होते. तर पूज्य संत आसाराम बापू यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांच्या धर्म व संस्कृतीचा विस्तार होत असून दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत असल्याचे रायता आश्रमाचे संचालक रघुभाई यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...