ऐतिहासिक कल्याण नगरीतील बस आगार नामशेष होणार, वर्कशॉप विठ्ठलवाडीला तर डेपो काही अंतरावर ?
कल्याण, (संजय कांबळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कल्याणच्या सुभेदाराची सून या मुळे इतिहासात प्रसिद्ध झालेल्या कल्याण नगरीतील कल्याण एसटी डेपोतील वर्कशॉप हे येत्या ७/८ दिवसात विठ्ठलवाडी ला हलविण्यात येणार आहे तर लाब पल्याच्या गाड्यांचा डेपो स्टेशन पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या बँडमिटंन मैदानावर सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांपासून प्रवाशांची सेवा करणारे कल्याण आगार नामशेष होणार असे चित्र दिसत आहे.
सन १९७२ मध्ये उद्घाटन झालेल्या कल्याण एसटी आगारला आज ५०/५१ वर्षे झालीत, कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, नगर, आणि तालुक्यातील खेडोपाडी या आगारातून बस धुरळा उडवत धावत होत्या, कल्याण तालुक्यातील वाड्या वसत्यावरील शेतकऱ्यांना तर ही बस म्हणजे त्यांच्या भाजीपाल्याचा बोजा वाहून नेण्यासाठी मोठा आधार वाटत होता. सध्या कल्याण एस आगारात ७० बसेस आणि सुमारे ३०० च्या आसपास कर्मचारी आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन पासून काही सेंकद अंतरावर हा डेपो असल्याने अगदी मुंबई हून येणाऱ्या किंवा नगर, मुरबाड, कसारा, नाशिक इकडून मुंबई ला जाणाऱ्या साठी कल्याण एसटी डेपो अत्यंत सोईचा वाटत होता. त्यामुळे या आगारात प्रवाशांची सदैव वर्दळ असते. सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालये येथे असल्याने, बाजारपेठ असल्याने सर्व वर्गातील लोक कल्याणला येजा करत असतात.
कल्याण एसटी आगार हे सध्या ५/८ एकर क्षेत्रावर पसरले असून स्मार्ट सिटी च्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामुळे या डेपोचे वर्कशॉप विठ्ठलवाडी येथे स्थलांतरित होणार आहे, तर कोकणात, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, येथे जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या या स्टेशन पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या बँडमिंटन डेपो वरून सुटणार आहेत, तर भिवंडी, पडघा,पनवेल, आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस या जुन्या ठिकाण्याहून सुटणार आहेत या सर्व गाड्यांना कल्याणात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ला सामोरं जावं लागत आहे. याचा त्रास प्रवासी व इतर लोकांना होतो.
विशेष म्हणजे लांब पल्याच्या गाड्या ज्या बँडमिंटन डेपोतून
जाणार आहेत तेथे प्रवाशासाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याचे काय? इतर सोईसुविधा चे कसे? कल्याण येथे बस नादुरुस्त झाली तर ती विठ्ठलवाडीला नेणार का?
असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचा एसटीच्या बुकिंगवर, प्रवासी संख्येवर परिणाम होईल का? आधीच विविध स्पर्धेत कसीबसी एसटी टिकून आहे, त्यात अजून गैरसोय झाली तर प्रवासी दूर जाणार नाही ना__ अशी भिती एसटीच्या अधिका-यासह कर्मचाऱ्यांना वाटते, तरीही प्रवाशांनी सहकार्य करावे, होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्हाला खेद आहे असे कल्याण एसटी आगाराचे आगार प्रमुख महेश भोई यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment