मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे विनायक नारळेकर यांना मदतीचा हात !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना नेते मा. खासदार अनंत गीते, महाड तालुका संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत खोपकर, खजिनदार संदिप चादिवडे, दौलत बेल्हेकर, श्रीकांत चिंचपुरे, राजेन्द्र पेडणेकर, वसंत घडशी, विश्वास तेली साहेब यांच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील रहिवाशी विनायक रमाकांत नारळेकर यांच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले होते. त्यांचे ऑपरेशन होणे आवश्यक होते. याची दाखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अगदी मोफत अंधेरी पूर्व येथील संजीवनी ममता हॉस्पिटल मधील डॉ. प्रतीक अग्रवाल यांनी दि.११ ऑक्टोबर २०२३ रोजी केले.दोन्ही डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन होऊन जेव्हा डोळ्यावरील पट्टी काढली त्यावेळी विनायक नारळेकर यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.कारण यापूर्वी ही मायेची सावली तर्फे त्यांना दोन्ही पायांना कृतिम पाय देऊन उभे केले होते. आता पुन्हा चांगली नजर देऊन समाधान दिले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या वतीने दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अगदी मोफत करून दिल्याबद्दल विभागात या संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे कौतुक होत आहे. अनेकांनी यानिमित्ताने त्यांना पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment