प्रकाश राऊत यांनी कोशिंबी येथे नवरात्रोत्सवच्या पहिल्या दिवशी केले स्नॅक्स कॉर्नरचे उदघाट्न !!!
ठाणे जिल्हा प्रतिनिधी : ता. 16 वालकस गावचे राहणारे श्री प्रकाश शांताराम राऊत यांनी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिक हायवेला लागून असलेल्या कोशिंबी-तलवली या फाट्यावर मुंबईकरांच्या आवडीचा असलेला वडापाव व इतर स्नॅक्स कॉर्नरचे उद्घाटन त्यांचे मोठे भाऊ विश्वज्योत सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष, संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक व दैनिक बातमीदार वृत्तपत्राचे उपसंपादक श्री विश्वनाथ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उद्घाटन प्रसंगी हजार होते. कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, जूचंद्र नायगाव येथे कार्यरत असलेले व अपंग संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश तुकाराम राऊत यांचे काका यांनीही उद्घाटन प्रसंगी भेट देऊन प्रकाश राऊत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर प्रकाश राऊत यांच्या सुख दुःखात सोबत राहणारा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच त्यांना चांगल्या कार्यासाठी आणि अनेक जणांनी फोन कॉल, फेसबुक, व्हाट्सअप यावरून शुभेच्छा दिल्या. त्यांनीही सर्व मित्रांचे आभार मानले.
उत्तम चव असलेले वडापाव अनेक वर्षापासून बनवत असल्याने शेजारच्या गावातून परिसरातून त्यांना वडापावची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. बारा रूपयास चविष्ट असा वडापाव देत असल्याने त्यांच्या स्नॅक्स कॉर्नरला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून आले.
आपणही सर्वांनी प्रकाश राऊत यांनी सुरू केलेल्या स्नॅक्स कॉर्नरला आवश्यक भेट द्या व चवीचा वडापाव खाल्ल्याचे अनुभव करा.
No comments:
Post a Comment