टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे सामिल !!
ठाणे , मिनल पवार : ठाण्यातील टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाच आकर्षण सार्यांनाच असतं. देवीचं लोभसवाणं रूप पाहण्याची भाविकांची मोठी गर्दी होते. या देवी आणि नवरात्र उत्सवाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुना संबंध आहे.
आज देवीच्या आगमन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी जातीने हजेरी लावली होती.
४८ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी हा देवी महोत्सव सुरू केला. उत्सव काळात येथे दररोज शेकडो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरा पुढे नेल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्ये सहकारी परंपरा पुढे नेत आहेत, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली आहे.
No comments:
Post a Comment