खासदार श्रीकांत शिंदे मनसेला मोठा धक्का !!
*कल्याण ग्रामीण मधील मनसे शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश*
डोंबिवली , मिनल पवार : कल्याण ग्रामीणमध्ये रंगलेल्या मनसे- शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण ग्रामीण मधील मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कल्याणमध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या वादाने टोकाचं वळण घेतलं असताना श्रीकांत शिंदेंनी मनसेला मोठा धक्का दिला आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये विकास कामांचा धडाका लावला, या विकास कामांना प्रेरित होऊन शेकडो मनसे पदाधिकऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं.
शिवसेना कार्यकर्ते सुहास तेलंग म्हणाले की, सोशल मीडियावर आणि ट्विटरवर विकास कामं होत नसून ती कामं प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला उतरून केली पाहिजेत. मात्र असं होत नसल्यामुळे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
No comments:
Post a Comment