पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबूरतर्फे मोफत वैद्यकीय शिबीर सह स्वच्छता किट, खाऊ, शालेय साहित्य, औषधे वाटप !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मुंबई सह उपनगर, कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) आर.सी.एफ चेंबूर तर्फे शाळेय विद्यार्थी यांच्या आरोग्य करिता मोफत वैद्यकीय शिबीर, नेत्र तपासणी, स्वच्छता किट आणि खाऊ, औषधे वाटप कार्यक्रम नुकताच श्री नारायण आचार्य विद्या निकेतन, आणिक गाव, चेंबूर, मुंबई -७१ येथे पार पाडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल कुमार श्रीवास्तव (कार्यकारी संचालक _आर सी. एफ ट्रॉम्बे ), निरंजन सोनक (मुख्य महाव्यवस्थापक आर. सी. एफ -चेंबूर ), आणि विशेष पाहुणे म्हणून मधुकर पाचरणे (उप महाव्यवस्थापक आर. सी. एफ. चेंबूर ), संतोष शिकतोडे (उप अभियंता, नवी मुंबई), धनंजय खामकर (मुख्य व्यवस्थापक आर सी. एफ), रुपाली वाधवाणी (मुख्य प्रबंधक आर सी. एफ), तज्ज्ञ डॉ. विनीत गायकवाड, डॉ. रजनीश कुमार, डॉ.अग्रवाल, डॉ. सुधाकर पाटील यांच्या सहित मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव -प्रदीप गावंड, उप अध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार सचिन साळुंखे, सह सचिव वैभव घरत, स्नेहा नानीवडेकर, नीलम गावंड, सल्लागार हनुमंता चव्हाण, मॅथ्यू डिसोझा, सतीश कुंभार, कैलास माने, रमाकांत गावंड, रहीम शेख, ऋषिकेश जंगम, सुशील कुमार मेस्त्री व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना औषधे, स्वच्छता साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन सुशीलकुमार मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष अशोक भोईर यांनी केले.
पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या १६ वर्षाहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत आहे. मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री.अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी, अंध विकलांग, वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते. गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प, नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे, तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.
समाजाला मदतीचा हात देत गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष - अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार -सचिन साळुंखे, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड, मॅथ्यु डिसोझा आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
Congratulations
ReplyDelete