Wednesday, 11 October 2023

भाजपा ओबीसी मोर्चाच्या संगमेश्वर तालुकाध्यक्ष पदी श्री. अमित रेवाळे यांची एकमताने निवड !!

भाजपा ओबीसी मोर्चाच्या संगमेश्वर तालुकाध्यक्ष पदी श्री. अमित रेवाळे यांची एकमताने निवड !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
     संगमेश्वर तालुक्यातील युवा नेते, समाजसेवक, युवाउद्योजक, आंगवली गावचे सुपुत्र मा. श्री अमितजी रेवाळे यांची संगमेश्वर तालुकाध्यक्ष: भाजपा ओबीसी मोर्चा (द.) पदी निवड करण्यात आली. भाजपचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष श्री. रुपेश कदम यांनी आपल्या तालुका कार्यकारणीत संगमेश्वर तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटातील कुणबी समाज्याचे उगवतं नेतृत्व श्री. अमित रेवाळे यांच्याकडे तालुक्यातील ओबीसी सेलची मोठी जबाबदारी दिली आहे. श्री. रेवाळे यांचा राजकीय अभ्यास, हरहुन्नरी पणा, समाज्यासाठी झोकून काम करण्याची सेवाभावी वृत्ती व युवाशक्तीचे वाढतं प्रभुत्व लक्षात घेता येणाऱ्या लोकसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या निवडणुकीत संगमेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुणबी ओबीसी समाज्याचे सहकार्य पक्षाला मिळणार असल्याचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत. 

       पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल व तालुक्यातील ओबीसी समाज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार दरबारी अतोनात प्रयत्न करेल असे मत यानिमित्ताने श्री.रेवाळे यांनी व्यक्त केले.या वेळी भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देत जिल्हाध्यक्ष श्री.राजेशजी सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोदजी अधटराव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.अभिजित शेट्ये व तालुकाध्यक्ष श्री. रूपेशजी कदम तसेच सर्व भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...