जी.टी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात शिव आरोग्य सेना आणि शिवसेना दक्षिण मुंबई, विभाग १२ तर्फे अपुऱ्या सोयींबाबत चर्चा !!
*मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे रिक्त, त्वरित भरण्याची मागणी*
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री सन्मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेते खा.श्री.अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना दक्षिण मुंबई विभाग १२ चे विभागप्रमुख श्री. संतोष शिंदे, महिला विभाग प्रमुख सौ. युगंधरा साळेकर यांच्या उपस्थितीत तसेच शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र समन्वयक श्री.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत सर्व सरकारी रुग्णालयातील आढावा घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्या "शिवसेना" आणि "शिव आरोग्य सेनेचे" पदाधिकारी जाणून घेत आहेत. जी टी रुग्णालयात आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात जीवनावश्यक औषधांचा पुरवठा नियमित होत आहे.सेंट जॉर्ज रुग्णालयात वर्ग- १ श्रेणीतील ३ पैकी २ पदे रिक्त आहेत, वर्ग २ श्रेणीतील डॉक्टरांच्या ४७ पदांमधील ४५ पदे रिक्त आहेत.अशीच अवस्था वर्ग ३ आणि वर्ग ४ श्रेणीतील मंजूर पदांची आहे. ३८२ नर्सेसची आवश्यकता असताना केवळ ७८ नर्सेस सर्व काम सांभाळत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात आजमितीस बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, युरोलॉजी तज्ञ डॉक्टरांची अत्यंत आवश्यकता आहे.
जी.टी रुग्णालयात देखील परिस्थिती काही वेगळी नाही. वर्ग १ श्रेणीतील मंजूर ३ पदांपैकी २ पदे रिक्त आहेत, वर्ग २ श्रेणीतील ७१ डॉ पैकी ५५ पदे रिक्त आहेत, ज्यात ४६ बाह्य डॉ.नाममात्र शुल्क घेऊन ओनररी सेवा देत आहेत.वर्ग ३ आणि वर्ग ४ श्रेणीतील अनुक्रमे ७९ पदांपैकी ३३ पदे आणि ३९४ पदांपैकी १८९ पदे रिक्त आहेत. रुग्णालयात आहारतज्ज्ञाची (डाएटीशन) जागा मागील ५ महिन्यांपासून रिक्त आहे. त्या बदल्यात तेथील डॉक्टरच रुग्णांच्या आहाराची काळजी घेत असल्याचे कळले (मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फारच घातक ठरू शकते). जी.टी रुग्णालयातील बहुतांश शस्त्रक्रिया भूलतज्ज्ञ नसल्यामुळे अनेक वेळा पुढे ढकलल्या जातात किंवा त्या रुग्णांना सर जे.जे रुग्णालयात हलविले जाते. एकंदरीत आरोग्य व्यवस्थेची ऐशीतैशी झालेली पाहायला मिळत आहे. या बैठकीत शिवसेना मा.नगरसेविका सौ.सुजाता सानप, श्री.संपत ठाकूर, शाखाप्रमुख व आजी माजी पदाधिकारी आणि "शिव आरोग्य सेनेचे" मुंबई समन्वय सचिव सौ.ज्योतीताई भोसले, मलबार हिल समन्वयक सचिव मिलिंद गजानन वेदपाठक, उपविभाग प्रमुख संपत ठाकुर, बाजीराव मालुसरे, सरीना तांबट, करुणा गिध, विधा.प्रमुख विकास मयेकर, विधा. संघटक गणेश सानप, मलबार हिल समन्वयक शिवाजी रहाणे शिवडी प्रभाग समन्वयक नंदकुमार बागवे, शिवसेना शाखाप्रमुख निलेश अहिरेकर, बाबू गोवेकर, संतोष धरत, जयवंत नाईक, शिरी कुमठेकर, निलेश चव्हाण तसेच महिला संघटक माधुरी पैठारी, रंजना एकवडे, सुरेखा हाडोळे आदींची उपस्थिती लाभली होती.
No comments:
Post a Comment