सेक्रेट हार्ट शाळेचे कर्मचारीही सेवाकार्यात आघाडीवर, वाहतूक कोंडी, अपघात, पुर परिस्थितीत सेवा !
कल्याण, (संजय कांबळे) : एखाद्या संस्था, संघटना किंवा पक्षाचा अध्यक्ष समाजाभिमुक असला म्हणजे काय बदल घडतो, याचे ज्वंलत व उत्तम उदाहरण म्हणजे वरप येथील सेक्रेट हार्ट शाळा, शाळेचे सीईओ अलबिन सर आणि त्यांचे कर्मचारी होय.
कल्याण तालुक्यातील वरप येथे सन २०००च्या आसपास सेक्रेट हार्ट शाळा सुरू झाली, तेव्हापासून ते आजपर्यंत २००५ चा पुर असो, त्यानंतर उद्भवलेल्या आजार असो अथवा इतर काही, शाळेने अनेकांना आधार दिला, कित्येकांच्या असाध्य आजारपणाला आर्थिक मदत केली, बहुतेकांचे जीवन वाचवले, कर्मचारी व त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत केली, हे सर्व करत असताना स्वतः च्या शाळेचा गुणवतेचा चढता आलेख सतत उंचावत ठेवण्यात ते कुठेही कमी पडले नाही.
गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याण मुरबाड मार्गावर असलेल्या म्हारळ, वरप, कांबा येथील खड्यांचा प्रश्न अडला होता, या रस्त्यावर अनेकांचा बळी गेला होता, कित्येकांना अपंगत्व आले होते, त्यामुळे शाळेचे सीईओ अलबीन सर यांनी हा मुद्दा उचलला इतकेच नव्हे तर ग्रामस्थांच्या मदतीने तो तडीस नेला, म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान होणार्या सिंमेट काँक्रिटीकरण रस्ता रुंदीकरण वेळी रस्तावरील अनेक उपयुक्त झाडे तोडली जाणार होती, हे लक्षात येताच शाळेने स्वखर्चाने वड, पिंपळ, निंबुडा, अशा वृक्षाचे पुर्नरोपन केले, आज शाळेच्या मागे वनजमीनीवर वनराई फुलली आहे, हे झाले शाळेचे व्यवस्थापक अलबीन सर यांचे सेवाकार्य, मात्र त्यांचे कर्मचारी, त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत सेवा कार्य करीत आहेत, रस्त्यावर अपघात असो, गाडी बंद पडलेली असो अथवा वाहतूक कोंडी असो, ते सदैव तत्पर असतात,
अगदी कालच कल्याण मुरबाड मार्गावर कांबा येथे भला मोठा कंटेनर बंद पडला, यामुळे काही क्षणात या रस्त्यावर तूफान वाहतूक कोंडी झाली, वाहनचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे दोन्ही बाजूंनी रस्ता पँक झाला, वाहतूक कोंडी रायता तर इकडे बिर्लागेट पर्यत पोहचली, जवळच असलेल्या म्हारळ पोलीस चौकीवर केवळ एक वाहतूक पोलिस, तोही बिचारा, जीव तोडून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होतो, पण वाहने इतकी होती की, हे प्रयत्न तोकडे पडत होते ,अशावेळी सेक्रेट शाळेचे कर्मचारी, वरप गावातील ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करत होते, या वाहतूक कोंडीत अनेक शाळेचे विद्यार्थी, रुग्णवाहिका अडकले होते, सुमारे एक ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
शाळेचे कर्मचारी सदैव सेवा करण्यासाठी तयार असतात, पुराच्या पाण्यात बंद पडलेल्या गाड्या, अपघातग्रस लोक, नदीची स्वच्छता, खड्डे भरणे अशी विविध सेवा कार्ये या शाळेचे विद्यार्थी व कर्मचारी यांच्या कडून होत असतात, याचेच एक पुढचे पाऊल म्हणून शाळेने परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने कांबा गावाचा कायापालट करण्यासाठी 'उज्जवल कांबा, फाऊंडेशन ची स्थापना केली आहे.
No comments:
Post a Comment