Monday, 16 October 2023

जयेश ट्रेंनिग क्लासेसच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी !!

जयेश ट्रेंनिग क्लासेसच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी !!

घाटकोपर, (एस. गुडेकर) :

            मुंबई मधील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी 5 वी आय.एस. एस.ओ राष्ट्रीय तायक्वांदो क्यूरोगी स्पर्धा पार पडली, येथे जवळ जवळ संपुर्ण भारतातून 29-30 विविध शाळांमधील 100-150 खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्याच प्रमाणे मुंबई येथील प्रसिद्ध असलेली जयेश ट्रेंनिग क्लासेसच्या खेळाडूंनी विविध आंतरराष्ट्रीय शाळांचे प्रतिनिधीत्व केले असून क्युरोगी या प्रकारात उत्तम कामगिरी बजावली आहे l. क्युरोगी या प्रकारात आरव पेंटर - जयश्री पेरीवल इंटरनॅशनल स्कूल ( जयपूर) - 17 वर्षाखालील 48 ते 51 किलो वजनीगटात याने सुवर्ण पदक जिंकले. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
              रौप्य पदक मध्ये विवान मेहता - बी. डी. सोमनी स्कूल (कोलाबा) - 14 वर्षाखालील 35 ते 38 किलो वजनीगटात. कार्तिकेय पांड्या - बी. डी. सोमानी इंटरनॅशनल स्कूल (कोलाबा) - 14 वर्षाखालील 38 ते 41 किलो वजनीगटात.  दियान मेहता - जमनाबई इंटरनॅशनल स्कूल (जुहू) - 14 वर्षाखालील 41 किलो आणि वरील वजनीगटात. आन्या शाह - ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल (गोरेगाव) - 17 वर्षाखालील 46 ते 49 किलो वजनीगटात. जयविर कोचर - जमनाबई इंटरनॅशनल स्कूल (जुहू) - 17 वर्षाखालील 51 ते 55 किलो वजनीगटात. अर्निक दोषी - डी. वाय. पाटील इंटरनॅशन स्कूल (वरळी) - 19 वर्षाखालील 68 ते 73 किलो वजनीगटात रौप्य पदक जिंकले. तर कर्व परमार - छत्रभुज नरसी इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली) - 14 वर्षाखालील 41 किलो आणि वरील वजनीगटात. क्रिश शाह - माउंट लिटरा इंटरनॅशनल स्कूल (बी. के. सी.) - 17वर्षाखालील 58 ते 63 किलो  वजनीगटात. हरमन सुरी - माउंट लिटरा इंटरनॅशनल स्कूल (बी. के. सी.) - 17 वर्षाखालील 63 ते 68 किलो  वजनीगटात कांस्य पदक पटकावले. संघाने सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर. जयेश वेल्हाळ आणि उप प्रशिक्षक निशांत शिंदे, चंदन परिडा, विनीत सावंत, यश दळवी, प्रणय मुल्की यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधीत्व केले संघाने क्युरोगि या प्रकारात 1 सुवर्ण पदक, 6 रौप्य पदक, 3 कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेसाठी गेले 3 ते 4 हप्ते मुंबई विभागातील जयेश ट्रेंनिग क्लासेसच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक निशांत शिंदे, यश दळवी, चंदन परिडा, स्वप्निल शिंदे, फ्रॅंक कनाडिया, क्रुपेश रणक्षेत्रे, प्रणय मुल्की, विनीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू होता. तसेच मास्टर. जयेश वेल्हाळ यांनी पदक विजेता खेळाडूंचे आणि अकादमीचा प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...