Monday, 16 October 2023

'लोकशाही सहकार उद्योग संवाद' कार्यक्रमात निलेश सांबरे यांचा पुरस्कार देऊन सन्मान !!

'लोकशाही सहकार उद्योग संवाद' कार्यक्रमात निलेश सांबरे यांचा पुरस्कार देऊन सन्मान !!

आमच्या कर्मावर आमचा विश्वास आहे त्यामुळे माझ्या सामाजिक कार्यात कितीही अडथळे आले तरी ते आम्ही पार करू - निलेश सांबरे 

आपल्या कुटुंबाची गरज भागल्यानंतर उद्योगातून येणारा अतिरिक्त पैसा हा आपल्या समाजाचा आहे - निलेश सांबरे  

मुंबई, प्रतिनिधी : लोकशाही मराठी वृत्तवाहिनी (चॅनल) तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान अनेक कार्यक्रमांतून विविध प्रसंगी केला जातो. याही वर्षी सहकार आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद आणि सन्मान समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते . या कार्यक्रमात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व उद्योजक  निलेश सांबरे यांच्याशी देखील संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. विविध सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील उद्योग संधी या विषयावर या कार्यक्रमात निलेश सांबरे यांच्याशी संवाद साधण्यात आला . तसेच त्यांच्या जिजाऊ संस्थेबद्दलच्या आतापर्यंच्या प्रवासाचाही या संवाद कार्यक्रमात आढाव घेण्यात आला .

या कार्यक्रमात मुलाखती दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना एक शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी उद्योजक आणि त्यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास सांबरे यांनी उलगडून सांगितला  "फक्त आपण मोठे होवून चालणार नाही आपला समाजही मोठा झाला पाहिजे . आपल्या कुटुंबाची गरज भागल्यानंतर उद्योगातून येणारा अतिरिक्त पैसा हा आपल्या समाजाचा आहे आणि तो समाजासाठीच वापरला पाहिजे . हे सांगताना आपल्याला हे करत असताना अनेक अडचणी आल्या त्यावेळी आपण केवळ माझ्या प्रामाणिक कार्यावर आणि नैतीकतेवर  माझा  विश्वास होता त्यामुळे आजही माझे सामाजिक कार्य चालूच आहे हे देखील त्यांनी यावेळी सांगितले . 

भविष्यातील संस्थेच्या उपक्रमांविषयी सांगताना सांबरे म्हणाले की ,भविष्यात शेतकऱ्यांसाठी अनेक सक्षम योजना राबविण्याचा विचार आहे. योजनाबध्द पद्धतीने जर आपण यावर काम केले तर निश्चितच इथला शेतकरी शेती पूरक व्यवसायाच्या आधारे व्यवासायिक शेती यशस्वीपणे करू शकेल . यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत . असे उद्योजक कि जे स्वत:च्या क्षमतेवर उभे राहतील समाजासाठीही उभे राहतील अश्या उद्योजकांसाठी देखील काही योजना राबविणार आहोत.  तसेच कुपोषणग्रस्त भागांतून कुपोषणाचा समूळ नायनाट करायचा आहे. त्यासाठी देखील व्यापक पद्धतीने चळवळ उभी करायची आहे. दिव्यांग आणि अनाथ मुलांना अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी काही योजना आखणार आहोत . आणि दुसरे महत्वाचे म्हणजे या व्यवस्थेवर शुद्ध राजकारणी बसावेत यासाठी देखील आमची यंत्रणा कार्यरत असेल असे देखील निलेश सांबरे यांनी यावेळी सांगितले. 

तर प्रत्येक तालुक्यात संस्थेच्या वतीने मोफत सीबीएसई स्कूल व प्रत्येक जिल्ह्यात संस्थेचा मोफात अद्यावत दवाखाना निर्माण करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , सुप्रिया सुळे यांसह उद्योग, राजकीय आणि समाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...