Tuesday, 17 October 2023

अडूर येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन !!

अडूर येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन !!

गुहागर / उदय दणदणे :

गुहागर तालुक्यातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व समाजनेते संतोष जैतापकर यांची रुग्णसेवेत कार्यरत असणारी "संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम" व वालावलकर रुग्णालय डेरवण
यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अडूर ग्रामपंचायत सभागृह, मु.अडुर ता.गुहागर येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिरात हर्निया, अल्सर, अपेंडिक्स, मुतखडा, टॉन्सिल्स, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मुळव्याध, चरबीच्या गाठी, कानाच्या पडद्याची तपासणी, प्रोस्टेट ग्रंथी, जनरल, पित्ताशयातील खडे, महिलांची गर्भाशय तपासणी, नाक, कान, घसा, नाकाचा हाड वाढणे, हायड्रॉसेल, प्रोस्टेटग्रथी, फायब्रोडेनोमा, स्तनाचा कॅन्सर, तोडाचा कॅन्सर, थायरॉईड, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, इम्प्लांट रिमूव्हर,अशा विविध आजारांवर  संबंधित सर्जन, अस्थीरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल मेडिसीन, नाक, कान, घसा यातील तज्ञ डॉक्टरांच्या वतीने विविध तपासणी व मार्गदर्शन लाभणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी सदर आरोग्य तपासणी सेवेचा निःसंकोचपणे लाभ घ्यावा, तसेच तपासणी दरम्यान एखादा रुग्ण शस्त्रक्रिया करण्या योग्य आढळल्यास पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याने नागरिकांनी येताना आपले मुळ रेशनकार्ड, ओळखपत्र, जुने तपासणी रिपोर्ट घेऊन यावेत, अधिक माहितीसाठी रुग्णसेक दिनेश झगडे- ९६७३८००५०७ मनोज डाफळे- ९८८१११५८४३ दिनेश देवळे -९७६४३६६७७०
विपुल नार्वेकर- ९७६४०४५५१२ निलेश घाणेकर- ७८७५९८६८६१ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन समाजनेते संतोष जैतापकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !!

वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !! कल्याण, २९ जानेवारी...