*"कन्या ही सासुऱ्यासी जाये" नाट्यप्रयोगाला भरभरून प्रतिसाद...!*
मुंबई / दिपक कारकर :
जीवनात प्रत्येक आई - बापाच्या पोटी जन्मलेली "कन्या" म्हणजे एक अनमोल नातं असते.कुटुंबातील एक सुख असते. ही कन्या लाडाची, मायेची, प्रेमाची, गुणाची अशाच विविध उपमांनी तीचे कौतुक होते.अशीच कहाणी व्यक्त करणारे संस्कारणीय कुटूंब वात्सल्य आणि त्यागाची परिसीमा जपणारे हृदयीस्पर्शी जिव्हाळ्याचे दोन अंकी नाटक "कन्या ही सासुर्यासी जाये" हा प्रयोग दामोदर नाट्यगृह, परळ ( मुंबई ) येथे रविवार दि.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं.०४ : ०० वा. अनेक प्रेक्षकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
रत्नलेखा निर्मित व सादकला प्रकाशित,हिरकांत करगुटकर लिखित तर प्रकाश लाड दिग्दर्शित ह्या प्रयोगाने तमाम रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. समाजात जगताना आयुष्यातील वाटेला आलेले अनेक प्रसंग, त्यातीलच बाप - आई - लेक नातं, स्त्री - जिवनाला असलेली पराकाष्ठा, अनेक दुःख वाट्याला आली तरी हसतमुखाने केलेला संघर्ष याचं यथार्थ वर्णन करणाऱ्या ह्या नाट्यप्रयोगाचे कोकण/मुंबईत आजवर ७ प्रयोग होऊन, पुढे अनेक प्रयोग होतील असे प्रतिपादन ह्या प्रयोगातील कलावंत यांनी केले. ह्या नाट्य प्रयोगातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय सादर केला. प्रयोगाची रंगत वाढविताना प्रयोगाला पार्श्वसंगीत - आनंद कुबल, संगीत - ओंकार आगरे, प्रकाश योजना - नितीन बैकर, नेपथ्य - उल्हास सुर्वे, रंगभूषा - जयवंत सातोस्कर, सूत्रधार - विजय गुरव, विजय आगरे आणि लाड ऐक्यवर्धक नाट्य मंडळ व कलाकार टीम - विजय गुरव, हरीश कदम, नवनाथ गुरव, ओमकार बोरकर, नरेश पिंपळे, प्रियांका आगरे, विनोदिनी घाडीगावकर, मनाली करन, संगीता काटकर व विजय आगरे यांच्या अथक परिश्रमाने सदर प्रयोग यशस्वीपणे पार पडला.
No comments:
Post a Comment