Monday, 16 October 2023

शारदीय नवरात्र उत्सवात तरी ग्रामीण भागातील'नारीशक्ती, च्या डोक्यावरील हंडा खाली उतरणार का? पाणी टंचाईची भिषणता !

शारदीय नवरात्र उत्सवात तरी ग्रामीण भागातील'नारीशक्ती, च्या डोक्यावरील हंडा खाली उतरणार का? पाणी टंचाईची भिषणता !

कल्याण, (संजय कांबळे) : सध्या देशभर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, आता नऊ दिवस स्त्रीला, आदीशक्ती, दुर्गा,भवानी, महिषासुरमर्दिनी, रणचंडिका, अशा विविध नावाने पुजले जाईल, तिचा उदोउदो केला जाईल, पण प्रत्यक्षात मात्र याच नारीशक्ती च्या डोक्यावरील पाण्याचा हंडा स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर देखील खाली उतरला नाही, हे खरेच सन्मानाचे, अभिमानाचे, आणि गौरवाचे आहे का?

विघ्नहर्ता गणेशेत्सवानंतर लगेचच नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या ९ दिवसाच्या काळात स्त्री शक्तीचा जागर घातला जातो, तिचे विविध रुपांचे प्रकटीकरण करून विधीवत पुजा, आर्चा केली जाते, दुर्गा, आदीशक्ती, भवानी माता, महिषासुरमर्दिनी, रणचंडिका, अशा नावाने तिचा उदोउदो केला जातो. महिला किती थोर आहेत, हे ९ दिवस अगदी ठसवून सांगितले जाते, हे जरी खरे असले तरी याच नारीशक्ती वर बलात्कार, विनयभंग, छेडछाड, एक तर्फी प्रेमातून हल्ले हे दिवसेंदिवस वाढत आहेत, हे झाले गुंडाकडून? तर राजकारणी, सत्ताधारी यांनी तर त्यांची पातळी या नारीशक्ती बाबत कधीच ओलांडली आहे, प्रत्येक जण आप आपल्या सोईनुसार या सण, उत्सवांचा वापर करतोय.

आता हेच बघा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, नागरिकांच्या मुलभूत अश्या अन्न, वस्त्र, आणि निवारा, आरोग्य, शिक्षण, पाणी या गरजांसाठी झगडावे लागत आहे.

केवळ ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि अंबरनाथ या तालुक्याचा विचार केला तर आजही गाव पाडे येथे रस्ते, पाणी, नाही, डबके, झरा, ओळ, अथवा नदीचे पाणी पायपीट करून आणावे लागते, प्रत्येक वर्षी लाखोंचे टंचाई आराखडे बनवले जातात, मात्र पाणी टंचाई काय दूर व्हायचे नाव घेत नाही,एकट्या शहापूर तालुक्यात २०२१- २२ मध्ये ६३०'९२ लक्ष रुपयांचा आराखडा बनविण्यात आला, यामध्ये ४८ गावे आणि १६३ पाडे यांना ४० टँकरने पाणी पुरवठा केला गेला, मुरबाड मध्ये २० गावे व २८ पाडे मधील सुमारे २५ हजार ४५० लोक पाण्यासाठी डोळ्यात पाणी आणून पाण्याची वाट बघत होते.२०२२-२३ या आराखड्यात २२८ गावे आणि ४३७ पाडे अशा एकूण ६६५ गाव पाड्याना भविष्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. म्हणजे या वाड्या पाड्यातील  नारीशक्ती ला पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन वनवन भटकावे लागेल, ही वस्तुस्थिती नाकारु शकतो का?

जलजीवनमिशन अंतर्गत कोंटीची कामे सुरू आहेत असे प्रशासनाचे म्हणनं आहे, परंतु ही कामे पुर्ण किती व अपूर्ण किती हे समोर आल्यावर खरे काय ते समजेल, कागदोपत्री एक व प्रत्यक्षात वेगळेच अशी स्थिती याची आहे, हरघर नल, नलसे जल हे तर अजून वेगळेच? नळ आहेत तर जल नाही आणि जल आहे तर पाईपलाईनचा पत्ताच नाही?
दुर्दैवी बाब म्हणजे जेव्हा जिल्हा परिषदेचे सीईओ किंवा आमदार, खासदार, मंत्री हे या भागात पाहणी, दौरा, करण्यासाठी आले तर त्यांना अशा ठिकाणी नेले जाते, की तेथे सर्व काही व्यवस्थित आहे, काही अडचणी नाहीत, समस्या नाही, लोकांना त्रास नाही, आणि हे महाशय देखील असेच समजतात की तालुक्यात, जिल्ह्यात सर्व काही सुरळित सुरू आहे. मात्र यात बिचा-या जनतेच्या नशिबाचा भोग काही संपत नाही, आजही अशी गावे आहेत की, ज्या गावात प्यायला पाणी नसल्यामुळे वडील आपली मुलगी त्या गावात देत नाहीत, लग्नाला नकार देतात. काही गाव, पाड्यात आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

एकूणच काय तर या ९ दिवसांच्या महिलांच्या उदोउदोत तरी नारीशक्ती च्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरो अशी माता दुर्गा चरणी प्रार्थना करावी असे वाटते. 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...