कल्याण तालुका/कल्याण शहर येथील ओबीसी बांधवांचे आपल्या न्याय्य हक्कांसाठी विशाल मोर्चाचे आयोजन !!
कल्याण, नारायण सुरोशी : आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसी बांधवांचे मंगळवार, दिं.17/10/2023 रोजी, सकाळी ठीक.10 वाजता कल्याण शहरात बिर्ला कॉलेज ते प्रांत कार्यालय अशा महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व OBC बांधवांनी या OBC विशाल मोर्चामध्ये स्वतःहून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आपलं आरक्षण वाचवण्यासाठी,आपल्या मुला मुलींना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी, मल्टीस्पेशालिटी आणि उच्च दर्जाच्या हॉस्पिटल मधे ओबीसींना आरक्षित खाटा असाव्यात, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाचे ओबीसिकरण करू नये, महिलांसाठी 50% आरक्षण जाहीर केले आहे त्यात OBC महिलांना एकूण पन्नास टक्के आरक्षण राखीव करण्यात यावे, सरकारने OBC समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृहे सुरू करण्याचे जाहीर केले होते ती वसतिगृहे तातडीने सुरू करण्यात यावीत.
या व अशा विविध मागण्यासाठी OBC महासंघाकडून 17/10/2023 या तारखेला कल्याण शहरात विशाल ओबीसी मोर्चाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील समस्त माता भगिनी, युवक युवतींनी, जेष्ठ मंडळी, वारकरी मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी, क्रिकेट - कबड्डी संघ, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्वच OBC बांधवांनी ह्या मोर्चा मधे स्वतःहून सहभागी व्हावे.
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि आपल्या न्याय हक्काच्या आरक्षणाच्या या लढाईत आज आपण मागे राहिलो तर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल म्हणून सर्वांनी आजच जागरूक राहून या लढाईत आपले योगदान द्यावे.पुन्हा एकदा विनंती करतो की कल्याण शहरात होणाऱ्या मोर्चात आपण तर सामील व्हावे व सोबत मित्र परिवार, नातेवाईक, यांना देखील येण्याचे आपण आवाहन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment