Monday, 16 October 2023

नेत्रोपचारासाठी ख्यातनाम एएसजी डोळ्यांचे रुग्णालय कल्याणकरांच्या सेवेत दाखल !!

नेत्रोपचारासाठी ख्यातनाम एएसजी डोळ्यांचे रुग्णालय कल्याणकरांच्या सेवेत दाखल !!

 *एएसजी समूहाचे रुग्णालय देशातील ८३ शहरात १६० हुन अधिक शाखा तर महाराष्ट्रात ७ वी शाखा*
 
 *कल्याण मधे  रुग्णांना मिळणार एक महिना मोफत ओपीडी सेवा* 

कल्याण, प्रतिनिधी - देशातील ख्यातनाम नेत्रउपचाराची साखळी एएसजी आपल्या विस्तार धोरणांतर्गत कल्याण येथे  दाखल होतं आहोत.

कल्याण मधील तिसरा मजला, रॉक माउंट रेसिडान्सी, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे दाखल होतं आहें.
एएसजी कल्याण शाखेचे उदघाटन आमदार विश्वनाथ भोईर हस्ते पार पडले. तर ऑपरेशन थेटर चे उदघाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटिल यांच्या हस्ते करण्यात आहें.

एएसजी हॉस्पिटल डोळ्यासंदर्भातील अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून सुविधा देणार सुसज्ज हॉस्पिटल आहें. कल्याण शहरात अशा हॉस्पिटलची आवश्यकता होती. सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम असल्याने रुग्णांना उत्तम उपचार याठिकाणी केले जातील.

सदर रुग्णालय मोतीबिंदू, लेसीक, विट्रो रेटिना सर्जरी, आक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा, कोर्निया, तिरळेपणा, ऑप्थल्मोलॉजी  नेत्ररोगाच्या श्रेणीवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व जटील शास्त्रक्रिया,  निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

एएसजी डोळ्यांचे रुग्णालय वेळोवेळी मोफत जनजागृती आरोग्य शिबीर आयोजित करणार आहेत. सध्या सर्वच वयोगटातील लोकांचे स्क्रीनटाईम अधिक असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याकरिता सातत्याने शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटना याठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वर्षातून प्रत्येकाने किमान २ वेळा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहें. 

एएसजी समूहाची वाटचाल -

सन २००५ मध्ये डॉक्टर अरुण सिंघवी आणि डॉक्टर शिल्पी गांग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजी आय समूहाची महुर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होतं गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एएसजी समूहाची स्थापना करण्यात आली.

एएसजी समूहाचे रुग्णालय संपूर्ण भारतात कार्यरत आहें. आंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयांची शाखा पूर्व आफ्रिका खंडातील युगांडा मधील कंपाला येथे कार्यरत असून दुसरी शाखा नेपाळ मधील काठमांडू येथे आहें.

मिळालेले मानाचे पुरस्कार एएसजी आय समूहाला आजवर अचिव्हरर्स 2009, उत्कृष्ट सेवेसाठी वेलनेस 2010, राजीव गांधी गोडमेडल 2014 आदी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.

एएसजी नेत्र रुग्णालयात चार अनुभवी आणि वरिष्ठ डॉक्टरांची टिम काम कार्यरत असणार आहें. ज्यामध्ये डॉक्टर नितेश साळूंखे, डॉक्टर रोहित मेंडके, डॉक्टर मानस देशमुख आणि डॉक्टर हरीष पाठक यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...