Monday, 16 October 2023

आशा गतप्रवर्टक यांचा येत्या 18 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा मोर्चा द्वारे इशारा..

आशा गतप्रवर्टक यांचा येत्या 18 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा मोर्चा द्वारे इशारा..

*१९ ऑक्टोबर ला जळगाव ला एल्गार*

चोपडा, प्रतिनिधी.. येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कॉम्रेड अमृत महाजन, सर्व श्रीमती मीनाक्षी सोनवणे, शालिनी पाटील, जोस्तना खंबायत, गटप्रवर्तक करुणा चौधरी व संध्या बोरसे यांचे नेतृत्वाखाली आशा कर्मचाऱ्यांच्या प्रचंड मोर्चा काल काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील सर्वच्या सर्व गटप्रवर्तक सहभागी झाल्या. 

त्यावेळी आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळाले पाहिजे. कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे 18000 रुपये वेतन मिळाले पाहिजे. शासकीय मोबाईल मिळाला पाहिजे. ऑनलाइन कामाची सक्ती बंद करा. साप्ताहिक सुटी व किरकोळ रजा मिळावी आधी मागण्यांचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी श्री डॉ. लासुरकर यांना सादर करण्यात आले. मोर्चाचे निवेदनात येत्या 18 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्यभर आशा व गटप्रवर्तक संपावर जाणार असून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा देण्यात आला.  

*19 ऑक्टोबर रोजी चलो जळगाव__
 
याच मागण्यांच्या पाठपुरावासाठी येत्या 19 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा परिषदेवर आयटक तर्फे प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी प्रचंड संख्येने हजर राहावे असे आवाहन करण्यात आले की आशा व गट प्रवर्तक यानच्या हक्कासाठी असलेल्या संपात संप काळात कर्मचाऱ्यांनी संप संपेपर्यंत युनियनच्या आदेशाचे पालन करावे .दमदाट्या व अफवांवर भरोसा ठेवू नये असे आवाहन केले.

या मोर्चासाठी सर्व श्रीमती शारदा महाजन, मुक्ताबाई महाजन प्रतिभा सनेर, वंदना मोरे,हप्रतिभा पाटील, विद्यादेवी बाविस्कर, मनीषा पाटील, संगीता साळुंखे, निर्मला साळुंखे, प्रतिभा माळी, गट प्रवर्तक एलिझा मोरे, ललिता शिरसाट, शैला राजपूत, सरला माळी तसेच सुशीला कोळी, ललिता चित्रकथी, दिपाली बावा, मनीषा बारेला, योगेश्वरी पाटील, रंजना इंधाटे, प्रतिज्ञा पाटील, हेमलता राजपूत आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...