कुणबी समाजोन्नती संघ शाखा चिपळूण नवीन कार्यकारणी जाहीर चंद्रकांत कोकमकर दुसऱ्यांदा अध्यक्ष पदी !!
मुंबई - निलेश कोकमकर
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न शाखा चिपळूण मुंबईची नवीन कार्यकारणी समिती सभा चंद्रकांत निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ह्या सभेत सन २०२३ ते २०२८ कार्यकालाकरिता नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. त्याप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची रीतसर नोंद मातृशाखा म्हणजेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई येथे सुपूर्त करण्यात आली.
कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी - चंद्रकांत कोकमकर, उपाध्यक्ष:-रामचंद्र बारे, प्रकाश चांदीवडे, सुदर्शन खापरे, रणजित वरवटकर, सरचिटणीस : दिपक पागडे, सहचिटणीस: किशोर शिगवण, संजय गोरीवले, सुनिल निर्मळ, खजिनदार : अमेय खापरे, अंतर्गत हिशोब तपासणीस :- बारकू बेंडल, कार्यकारणी सदस्य: निलेश कोकमकर, सचिन गोमाणे, सुरेश भुवड, सचिन बुदर, अनिल पेंढारे ,संघ प्रतिनिधी :- चंद्रकांत कोकमकर, दीपक पागडे, अमेय खापरे, दीपक चव्हाण, राजेश बेटकर, महिला मंडळ प्रतिनिधी:- दिपीका आंग्रे, विवाह मंडळ प्रतिनिधी :- निलेश पवार, युवक मंडळ प्रतिनिधी :- निलेश कोकमकर, निळकंठ तांबे, बारकू बेंडल, प्रितेश वाकडे, अमर कोकमकर , सल्लागार मंडळ :- राजाभाऊ कातकर, सुनील डिंगणकर, सुर्यकांत तांदळे, सुभाष आदावडे इर्त्यांदीची निवड करण्यात आली आहे.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ह्या मातृ शाखेच्या नियम आणि धोरणे यांच्या अधीन राहून चिपळूण शाखा कार्यकारणी रीतसर कार्य करेल. शाखा प्रतिनिधी वाढवणे, समाजोउपयोगी शैक्षणिक , रोजगार , वैद्यकीय असे विविध उपक्रम राबवने आणि काही प्रलंबीत कामे लवकरच पूर्णत्वास केली जातील अशी आशा व्यक्त करण्यात आली. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न शाखा चिपळूणच्या सर्व सभासद, सदस्य, समाज बांधव यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment