मोदी सरकारची गच्छंती 2024 ला अटळ, शेतमजूर वर्गाने संघटित व्हावें - नितीश कुमार
*खेतमजदुर युनियन रॅलीत आवाहन*
पाटणा, प्रतिनिधी.. येथे भारतीय खेत मजदूर युनियन चे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर कालावधीत घेण्यात येत आहे. त्या निमित्ताने बिहार खेत मजदुर युनियन तर्फे प्रचंड रॅली काढण्यात आली. त्यावेळी जनता दल यू कार्यालय शेजारी बेली हायस्कूल ग्राउंड वर प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, येत्या 2024 मध्ये मोदी सरकारची गच्छंती निश्चित असून ते इंडिया आघाडीमुळे धास्तीत आलेले आहेत, या सभेला उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ही हजार होते ते म्हणाले की, या देशात जाती धर्माच्या नावाने झगडे चालवून देणार नाही. बेरोजगारांना नोकरी व महागाई मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. बिहार राज्यांमध्ये सर्व जाती धर्मांचा डाटा उपलब्ध असल्यामुळे त्या डाटावर आता आम्हाला विकासाचे नियोजन करावे लागणार आहे. देशात ही ओबीसी चे जनगणना करण्याची गरज आहे.
या सभेत भाकपचे राष्ट्रीय महा सचिव कॉ. डी. राजा यांचे प्रमुख मार्गदर्शनपर भाषण झाले ते आपल्या भाषणात म्हणाले की, मोदी सरकार हे कामगार कष्टकरी गरीब लोकांचे सरकार नाही 2024 मध्ये त्यांना सत्तेवरून काढून टाकले पाहिजे, मोदी सरकार फक्त दोन उद्योगपतींचे सरकार असून देशाचे उद्योगधंदे खाजगी करण्याच्या पाठीमागे लागले आहेत. शेतकऱ्यांच्या एकजुट व 700 शेतकरी आंदोलकांच्या हौतात्म्या मुळे त्यांना काळे शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले. 2024 ला भाजपा हटाव देश बचाओ.. घोषणा महत्वाची राहणार आहे. बिहारच्या काँग्रेस राष्ट्रीय जनता दल जनता दल कम्युनिस्ट पार्टी, कमुनिस्ट पार्टी एम एल, आदी पक्षांनी इंडिया आघाडीची या पहिल्या सभाचे नियोजन बिहारमध्ये भाकप चे केले त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.. या रॅलीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांची आवर्जून उपस्थिती होती. या रॅलीत बिहार मधील सर्व जिल्ह्यांमधून लाखो शेतमजूर लाल झेंडे हाती घेऊन आलेले होते. सायंकाळी लायब्ररी पटांगणा त अधिवेशनाची स्वागताध्यक्ष आमदार सूर्यकांत पासवान यांच्या भाषणाने सुरुवात झाली अधिवेशनात महाराष्ट्राचे 40 प्रतिनिधी राज्याध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण व शिवकुमार गणवीर यांचेसह 40 प्रतिनिधी उपस्थित आहेतअसे पटण्याहून शेतमजुर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण शिंदे व कॉ. अमृत महाजन यांनी कळविले आहे
No comments:
Post a Comment