भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणीची बैठक !!
कल्याण, सचिन बुटाला : भाजपा महिला जिल्हा मोर्च्याच्या अध्यक्षस्थानी मा. नगरसेविका रेखा राजन चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज दि. ०२ नोव्हेंबर रोजी जिल्हा कार्यकारिणीच्या प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कल्याण जिल्हा महिला मोर्चाची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे.
सदर बैठकीत आज जिल्हा महिला मोर्चाची उपाध्यक्ष व सचिव यांना मंडळ स्तरावर समन्वयक व सह-समन्वयक यांची नेमणूक करून त्यांना पत्रक देऊन जवाबदारी दिली. यावेळी अनेक नवीन सदस्य महिलांची जिल्हा स्तरावर नियुक्ती केली. प्रकोष्ठ सयोजकांना त्यांची जवाबदारी मा .रेखाताईनी समजून सांगितली.
या वेळेस श्री आशिषजी पावसकर यांनी देखील आगामी काळासाठी महिलांना बूथ ते जिल्हा यासाठी प्रत्येक महिलांनी सज्ज राहावे व पॉलिटिकली अलर्ट राहून आपले सहकार्य व वेळ पक्षा साठी द्यावे असे सांगितले. आजच्या प्रथम बैठकी साठी संपूर्ण महिला मोर्चाच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment