डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्यांचा बाहेरील मासे विक्रेत्यांना विरोध !! *मासे विक्रेत्यांममधील वाद विकोप्याला*
*डोंबिवलीत आज सकाळ पासून स्थानिक मासे विक्रेत्यांचे आंदोलन मासे विक्री बंद*
डोंबिवली - मिनल पवार
डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेता आणि बाहेरून येणाऱ्या मासे विक्रेत्यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी मोठ्या संख्येने डोंबिवली येथील मासे विक्रेते बाहेरुन येणाऱ्या मासे विक्रेत्यांना विरोध करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर मधील रस्त्यावर उतरले होते.
वसईहून मासे विक्रेते डोंबिवलीत येऊन मासे विक्री करतात त्यामुळे स्थानिक मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून उपासमार सुरू असल्याचा आरोप डोंबिवलीतील स्थानिक मासे विक्रेत्यांनी केला.वसईहून डोंबिवलीत येणाऱ्या मासे विक्रेत्यांनी वसईतच मासे विक्री करावी त्यांनी डोंबिवलीत येऊ नये अशी मागणी स्थानिक मासे विक्रेत्या महिलांनी केली, गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत असूनही काहीच तोडगांना निघाल्याने आज डोंबिवलीचे स्थानिक मासे विक्रेत्यांनी या निषेधार्थ डोंबिवलीतील मच्छी मार्केट बंद ठेवलं होतं. याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढन्यत येईल असे सांगितले. ऐन शुक्रवारी डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी मासे विक्री बंद केल्याने मासे खाणाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.मात्र वसई विरार येणार वरुन येणारे मासे विक्रेते हे मराठी असल्याने त्यांना विरोध करणे
चुकीचे असल्याचे मत डोंबिवली येथील एक माजी नगरसेवकाने व्यक्त केले.राजकारणी डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांना सहकार्य करत नसल्याबद्दल मासे विक्रेत्या महिलांनी नाराजी व्यक्त केली.बाहेरुन येणारे मासे विक्रेते बंद न झाल्यास आम्ही तिव्र आंदोलन छेडून असा इशारा महिलांनी दिला.डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रल्हाद खंदारे यांनी मध्यस्थी करून दोन्हीही मच्छीमार संघटनांशी तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.
No comments:
Post a Comment