रोनक सिटी, कल्याण (पश्चिम) येथील कामाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन !!
कल्याण , सचिन बुटाला : कल्याण शहरातील नविन कल्याण म्हणून नावलौकीक मिळवलेल्या रोनक सिटी परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ झाला. कल्याण पश्चिमेचे आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली.
कल्याण पश्चिमेच्या रोनक सिटी परिसरातील ओम रेसिडेन्सी ते रोनक सिटी पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. हा रस्ता तातडीने डागडुजी करून दिलासा देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी मा.नगरसेवक जयवंत भोईर आणि प्रभुनाथ भोईर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना लवकरच आता दिलासा मिळणार आहे.
याउदघाटन प्रसंगी शहरप्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक/मा. नगरसेवक प्रभुनाथ भोईर, मा.नगरसेवक जयवंत भोईर, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ.धीरज पाटील, उपविभाग प्रमुख सिकंदर मढवी, महाराष्ट्र राज्य विस्तराक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आनंद चिराग, भरत राठोड तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment